श्रीलंका सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. हे संकट दिवसेंदिवस अधिकच मोठे होत असल्याचे दिसत आहे. त्याठिकाणचे परिस्थिती सध्या खूपच बिघडली आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकन संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्याही आंदोलनात सहभागी झाला आहे. जयसूर्याने श्रीलंकेच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्यासाठी भारताचे आभार मानले आहेत.
आंदोलक राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत आणि सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) देखील या आंदोलनात सहभागी झाला आहे. देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे, पण राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे त्यांच्या कुटुंबाला घेऊन बेपत्ता झाले आहेत. जयसूर्याच्या मते त्यांना शांततापूर्ण प्रदर्शन हवे आहे.
दरम्यान, जयसूर्या राष्ट्रपतींच्या राजणाच्यासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनांमध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी झालो आहे. जयसूर्या म्हणाला की, सर्वांनाच शांततापूर्ण आंदोलन हवे आहे आणि सर्वजण तेच करत आहेत. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मी पहिल्या दिवसापासून आंदोलकांसोबत होतो.
स्पीकर, वरिष्ठ राजकारणी, पक्षातील सर्व नेत्यांनी लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. एकदा सरकार बनल्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, भारत आणि इतर सर्व राष्ट्र श्रीलंकेची मदत करतील. भारत या संकटात पहिल्यापासूनच खूप मदत करत आहे. आम्ही यासाठी त्यांचे आभार आहोत. भारत श्रीलंकेसाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघातील दुसरा कसोटी सामना गॉल स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना सुरू असताना आंदोलकांनी गॉला स्टेडियम पूर्णपणे घेरले होते. याच कारणास्तव सामना अर्ध्यातून रद्द होण्याची भीतीही निर्माण झाली होती. परंतु आंदोलकांनी सामन्यात कसलीही बाधा न आणल्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला.
सामना सुरू असताना काही आंदोलक जुण्या किल्ल्यावर चढले होते. कुणालाही या किल्ल्यात जाण्याची परवानगी नव्हती, पण आंदोलकांनी कुणाचेही ऐकले नाही. जयसूर्याही या आंदोलनात सहभागी होता आणि त्याने अशी प्रतिक्रिया दिली होती की, “मी या आंदोलनाचा भाग आहे आणि लोकांच्या मगणीसोबत आहे. हा विरोथ मागच्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे.”
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॉला स्टेडियमवर खेळला गेला आणि श्रीलंकन संघाने हा सामना ३९ धावांनी जिंकला. मालिकेतील पहिला सामनाही गॉल स्टेडियवरच खेळला गेला होता, जो ऑस्ट्रेलियाने १० विकेट्सने जिंकलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडची झोप उडवणाऱ्या सूर्यकुमारलाच लागेना झोप! पत्नीने केला रात्रीचा व्हिडिओ शेअर
‘तेव्हा गांगुली- सेहवागलाही संघातून वगळलेले, मग आता…?’ माजी दिग्गजाची कोहलीवर अप्रत्यक्ष टीका
बाप तसा बेटा! बेकहमच्या फ्री-किक पुनरावृत्ती झाली त्याच्याच मुलाकडून, पाहा व्हिडिओ