जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डेविड बेकहमचा मुलगा रोमियो वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे. इंटर मायामी २ (Inter Miami II) विरुद्ध ओरोलॅण्डो सिटी २ (Orlando City II) यांच्यात झालेल्या सामन्यात रोमियोचा उत्तम शॉट पहायला मिळाला आहे. रोमियो हा इंटर मायामी सीएफ संघाकडून खेळला. या सामन्यात त्याने ८३ व्या मिनिटाला एक गोल केला. त्या गोलने नक्कीच डेविड बेकहमला आपल्या जुन्या आठवणीत पाठवले असेल. कारण रोमीयोनेही लांबून फ्रि कीकवर गोल केला आहे.
OFF THE SET PIECE!
Romeo Beckham scores his first goal of the season from distance! ???? pic.twitter.com/5qRGnF0bEM
— MLS NEXT Pro (@MLSNEXTPRO) July 11, 2022
डेविड हा रिअल माद्रिद, मॅनचेस्टर युनाईटेड आणि एसी मिलानसाठी खेळताना आपल्या उत्कृष्ट फ्रि कीकसाठी ओळखला जायचा. तसाच काहीसा गोल रोमियोने लगावत आपला या हंगामातील पहिला गोल केला. त्याच्या या गोलनंतर ‘बेंड इट लाइक बेकहम’ हा वाक्प्रचार म्हणायला सुरु होईल असे दिसते आहे. तो जर असेच गोल करत राहिला तर नक्कीच आपल्या वडिलांसारखे जगभरात नाव कमवेल असे वाटते आहे.
It’s been 20 years since Beckham scored THAT free kick against Greece, to take England to the 2002 World Cup.
Feel old yet? pic.twitter.com/0UGuD5JFLx
— Ball Street (@BallStreet) October 6, 2021
(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)