विश्व क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू पुनरागमन करत असतात. परंतू खुप कमी खेळाडू असे आहेत जे आपले स्थान नेहमीसाठी कायम राखतात. तर मध्ये समालोचन करणाऱ्या दिनेश कार्तिकने भारतीय संघात ऐतिहासिक पुनरागमन केले आहे. मात्र त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध केले्या एका खेळी ऐवजी त्याला फारसे काही करता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या भारतीय संघातील स्थानावर पुन्हा एकदा टांगती तलवार उभी राहिली आहे.
होय, आपली पुर्ण कारकीर्दीच भारतीय संघात आत बाहेर करणारा दिनेश कार्तिक पुन्हा एकदा संघात बाहेर जाऊ शकतो. त्याने यावर्षी भारतासाठी खेळलेल्या ९ सामन्यात केवळ एक अर्धशतक केले आहे. त्यापलीकडे त्याचे प्रदर्शन मात्र फिकेच राहिले आहे. तर तो मॅच फिनिशिंग खेळी करण्यास अपयशी ठरला आहे. त्याने पुनरागमन झाल्यापासून टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २१च्या सरासरीने तर १३४च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत जे की आयपीएलच्या तुलनेत फारच कमी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)