भारतीय संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. अष्टपैलू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या जागी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला भारतीय संघात निवडले गेले आहे. त्याला निवडल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेवर माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
दुखापतीमुळे अक्षर पटेल बाहेर झाल्याने रविचंद्रन अश्विन याला संधी दिली गेली. त्याला बोलताना संदीप पाटील म्हणाले,
“संघात निवड होऊन बाहेर जाणे दुर्दैवी असते. अक्षरसाठी हा कठीण काळ असेल. मात्र, त्यानंतर अश्विनला संघात सामील करणे हा योग्य निर्णय ठरला. एक प्रकारे अक्षरची दुखापत भारताच्या पथ्यावर पडली. कारण, एक अनुभवी फिरकीपटू संघात सामील झाला. त्याने चांगली कामगिरी करावी अशी माझी अपेक्षा आहे.”
अश्विन आपल्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा वनडे विश्वचषक खेळेल. 2011 मध्ये त्याने प्रथम वनडे विश्वचषकात सहभाग घेतलेला. त्यावेळी भारतीय संघ विजेता ठरलेला. त्यानंतर 2015 विश्वचषकात देखील तो भारतीय संघाचा भाग राहिलेला. मागील विश्वचषकात जागा मिळवण्यात त्याला अपयश आलेले.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
(Sandeep Patil Big Statement On Axar Patel Exclusion From World Cup Sqaud)
हेही वाचा-
जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा
सराव सामन्यात इंग्लंड पुढे बांगलादेश पस्त! टोप्ली-मोईनने गाजवली गुवाहाटी