इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२ ही स्पर्धा रविवारी (२९ मे) अंतिम सामना झाला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला. राजस्थानचा संघ तब्बल १४ वर्षांनंतर आयपीएल चषकाच्या इतक्या जवळ येऊन पोहोचला आहे. याआधी जेव्हा राजस्थान अंतिम सामन्यात पोहोचला आणि आयपीएल चषक जिंकली होती त्यावेळी संघाचा कर्णधार होता ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न. मात्र, वॉर्नचा संघाचे मालक मनोज बदाले यांच्यासोबत एकदा वाद झाला होता.
एक वेळ अशी होती की संघ मालक मनोज बदाले (Manoj Badale) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांच्यात संघ निवडीवरून खूप गोंधळ उडाला होता. तो इतका गंभीर होता की, वार्नला संघ सोडायचा होता. शेन वॉर्नच्या ऑटो बायोग्राफी ‘नो स्पिन’ मध्ये हा किस्सा उघड केला आहे. ज्यामध्ये त्याला राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बदाले यांनी १६ जणांच्या संघात आणखी एक खेळाडू जोडावा अशी इच्छा व्यक्त केली होती. पुस्तकात कोणत्या खेळाडूच्या निवडीबाबत खुलासा करण्यात आला नसला तरी वॉर्नने कोचिंग स्टाफसह ५० खेळाडूंच्या यादीतून १६ खेळाडूंची निवड केल्यानंतर बदाले यांना हा बदल करायचा होता, असे सांगण्यात आले आहे.
दिवसभराच्या टीम ट्रायल्सच्या अनकॅप्ड रवींद्र जडेजा आणि स्वनिल असनोडकर यांनी ऑस्ट्रेलियन दिग्गजांना प्रभावित केले. परंतु, बदाले यांना आणखी एक अनकॅप्ड खेळाडू जोडायचा होता. ज्याला वॉर्नने आसिफ म्हणून संबोधले. त्याच्या चाचण्यांमधील कामगिरीने वॉर्न फारसा प्रभावित झाला नसला तरी बदाले यांनी आसिफच्या समावेशासाठी सतत दबाव आणला होता.
वॉर्न म्हणाला की, “तो चाचण्यांमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. जर आसिफचा संघात समावेश झाला, तर ड्रेसिंग रूममध्ये त्याचा अनादर केला जाईल.”
पुढे वॉर्न म्हणाला की, “जर तुम्हाला आसिफ संघात हवा असेल, तर ठीक आहे मी तुमचे पैसे परत देईन आणि मी संघाचा भाग होणार नाही.” यावर मनोजने “तू सिरीयस आहेस का?”, असा प्रश्न विचारला. त्यावर वॉर्नने ठामपणे होकारार्थी उत्तर दिले होते.
दरम्यान, १४ वर्षांपूर्वी आयपीएलची सुरुवात झाली होती, त्यावेळी पहिल्याच हंगामात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. त्यानंतर पुढच्या १३ हंगामात आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यास अयशस्वी ठरला होता. काही दिवसांपूर्वीच राजस्थानचा माजी कर्णधार शेन वॉर्न याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे यंदा आयपीएल चषक उंचावणे हे राजस्थानच्या फक्त प्रतिष्ठाच नाही, तर भावनिकतेशी सुद्धा जोडलेले आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा
हेही वाचा
IPL फायनलमध्ये ‘हे’ ५ खेळाडू गाजवू शकतात मैदान, सर्वांच्या असतील त्यांच्यावर नजरा
IPL Final: ‘हे’ गणित जुळून आले, तर राजस्थानला मानावे लागेल उपविजेतेपदावर समाधान
गुजरातला IPL फायनलपर्यंत घेऊन जाणारा हार्दिक पांड्या होणार भारताचा कर्णधार?