भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा ही आपल्या कारकिर्दीतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन 2023 नंतर ती कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी होणार नाही. मात्र, आपल्या कारकिर्दीतील ही अखेरची महत्वपूर्ण स्पर्धा खेळताना तिने शानदार कामगिरी नोंदवली. भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना याच्यासह तीने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
In a fitting farewell, @MirzaSania's last dance will take place on the grandest stage!
She and @rohanbopanna 🇮🇳 have qualified for the Mixed Doubles Final!@wwos • @espn • @eurosport • @wowowtennis • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/qHGNOvWMoC
— #AusOpen (@AustralianOpen) January 25, 2023
सानिया या स्पर्धेत मिश्र दुहेरी व महिला दुहेरी अशा दोन विभागात सहभागी झाली होती. मात्र, महिला दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत तिला व तिच्या साथीदार खेळाडूला पराभूत व्हावे लागले होते. मात्र, मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून तिने विजेतेपदाचे आपले स्वप्न कायम राखले आहे.
सानिया व रोहन या जोडीने उपांत्य फेरीत केएन स्कूपकी व करावजिस यांना 7-6,6-7,10-6 असे पराभूत करत अंतिम फेरीत जागा बनवली. सानिया व रोहन जोडीला उपांत्यपूर्व फेरीत व वॉक ओव्हर मिळाला होता.
सानियाने आत्तापर्यंत आपल्या कारकिर्दीत पाच ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. याच जोडीने 2017 मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. सानियाने भारताचा माजी दिग्गज टेनिसपटू महेश भूपती याच्यासह 2009 मध्ये ही स्पर्धा आपल्या नावे केली होती. सानिया या स्पर्धेनंतर होणाऱ्या दुबई डब्ल्यूटीए 1000 टेनिस चॅम्पियनशिपनंतर सर्व प्रकारच्या टेनिसला अलविदा करणार आहे.
(Sania Mirza And Rohan Bopanna Entered In Australian Open 2022 Mixed Doubles Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC ODI Rankings: शानदार शुबमनसह रोहितही टॉप 10मध्ये, पण विराटला बसला फटका
सिराजच्या शिरपेचात मानाचा तुरा, भल्याभल्यांना पछाडत वनडे रँकिंगमध्ये बनला अव्वल गोलंदाज