अवघ्या १९ व्या वर्षी आंतरराष्टरीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून कारकिर्दीतल्या पहिल्याच क्रिकेट मालिकेत धमाल करणारा. तसेच एकेकाळी पाकिस्तान क्रिकेट गाजवणारा आणि आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर संघाला अनेकवेळा विजय मिळवून देणारा खेळाडू, पाकिस्तानचा पूर्व कर्णधार शोएब मलिक याने नुकताच आपला (१ फेब्रुवारी) आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला आहे. शोएब याचा जन्म १ फेब्रुवारी १९८२ रोजी पाकिस्तानमधील पंजाब स्थित सियालकोटमध्ये झाला होता. शोएबची पत्नी सानिया मिर्झा हिने वाढदिवसानिमित्त आपल्या पतीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्नी सानिया मिर्झा सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली..
सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारी सानिया मिर्झा हिने सोशल मीडियवर शोएब सोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने शोएबसाठी प्रेम, यश आणि आनंद मिळो यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच पुढे ती म्हणाली, ‘त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ज्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. हे वर्ष तुझ्यासाठी भरभराटीचे जावो. जेव्हा तू तुझा क्रिकेट सराव पूर्ण करून घरी येशील तेव्हा हे सर्व मी तुला सांगेल.’ अशा भाऊक शब्दात पत्नी सानिया मिर्झा हिने शोएब मलिक याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CKveZ3aFJOH/?utm_source=ig_web_button_share_sheet
शोएब मलिक सध्या अबू धाबी सुरू असलेल्या टी१० लीगमध्ये मराठा अरेबियंस संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. याआधी तो श्रीलंका प्रिमियर लीगमध्ये विजयी संघ जाफना स्टैलियंस या संघाकडून खेळत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
नांदेडकरांना लाभणार रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णीचे मार्गदर्शन, लवकरच सुरू करणार क्रिकेट अकादमी
“भारतीय खेळाडू विराटला घाबरतात”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य