fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सानिया मिर्झा म्हणते, माहित नाही माझा मुलगा कधी परत त्याच्या वडिलांना बघेल

Sania Mirza Worried as she don't know when his Son going to meet Shoaib Malik

भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा हैद्राबादमध्ये आपल्या परिवारासोबत राहत आहे. असे असले तरीही तिला सतत एक चिंता सतावत आहे की, तिचा मुलगा इजहान केव्हा आपल्या वडिलांचा चेहरा पाहिलं.

सानियाचे (Sania Mirza) पती आणि पाकिस्तान संघाचा खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) आपल्या आईबरोबर पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये आहे. कोरोना व्हायरसमुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. लोक जिथे आहेत तिथेच राहत आहेत. अशामध्ये सानिया आणि शोएबलादेखील वेगवेगळ्या देशात रहावे लागत आहे.

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) लॉकडाऊनपूर्वी सानिया अमेरिकेत होती. फेड कप प्लेऑफमध्ये ऐतिहासिक वियज मिळविल्यानंतर सानियाला इंडियन वेल्स स्पर्धा खेळण्यासाठी जायचे होते. परंतु ती तेथे पोहोचण्यापूर्वीच स्पर्धा रद्द झाली होती. त्यामुळे ती भारतात परतली होती. तर मलिक त्यावेळी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत होता.

सानिया म्हणाली की, “शोएब पाकिस्तानमध्ये आहे आणि मी इथे. आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. कारण आम्हाला लहान मुलगा आहे. मला माहित नाही की, मुलगा इजहान केव्हा पुन्हा आपल्या वडिलांना भेटेल. आम्ही दोघेही सकारात्मक व्यक्ती आहोत.”

“शोएबची आई ६५ वर्षांची असून सियालकोटमध्ये एकटी राहते. त्यामुळे त्यांना मलिकची अधिक आवश्यकता होती. आम्ही तेच केले जे आम्हाला योग्य वाटले. मला आशा आहे की, आपण लवकरच या व्हायरसमधून सुरक्षितपणे बाहेर पडू,” असेही सानिया यावेळी म्हणाली.

सानिया दोन वर्षांच्या प्रसूतीच्या रजेवरुन परतल्यानंतर २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी तयार होती. परंतु सध्या कोविड-१९च्या साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तिला आशा आहे की, ती पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंम्पिकसाठी टोकियोमध्ये उपस्थित असेल.

सानियाच्या नावावर ३ दुहेरी आणि ३ मिश्र दुहेरी असे मिळून एकूण ग्रँड ६ स्लॅम्सचे विजेतेपद आहेत. याबरोबरच तिने फेड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारताला पहिल्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचवले होते. त्यामुळे तिला फेड कप हर्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-बंदी घातलेला क्रिकेटपटू म्हणतोय, मला भारताला जिंकून द्यायचाय २०२३चा विश्वचषक

-कोहलीसोडून टीम इंडियाचे कर्णधार होण्यासाठी तयार असलेले ३ खेळाडू

-या कंपनीने दिला होता सचिनला धोका, आता मागावी लागली थेट माफी

You might also like