शुक्रवारी (19 जानेवारी) पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक याने अभिनेत्री सना जावेद हीच्यासोबत लग्न केले. त्याने सोशल मीडियावर लग्नानंतरचे फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना याची माहिती दिली. पोस्ट शेअर करताना शोएब मलिकने कॅप्शनमध्ये लिहिले, “अलहमदुलिल्लाह आम्ही एक नवीन जोडी बनवली.”
विशेष म्हणजे शोएब मलिकचे (Shoaib Malik) हे तिसरे लग्न आहे. 2010 मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी (Sania Mirza) लग्न करण्यापूर्वी त्याने आपली पहिली पत्नी आयशा सिद्दीकी हिला घटस्फोट दिला होता.
‘द पाकिस्तानी डेली’च्या वृत्तानुसार, मलिकचे कुटुंब त्याच्या तिसऱ्या लग्नावर खूश नाही आणि त्यांनी लग्नसोहळ्यालाही हजेरी लावली नाही. सानिया तिच्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सला कंटाळली होती, असेही वृत्त आहे.
2010 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सानिया-शोएबच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. हैदराबादी पारंपारिक मुस्लिम पद्धतीने या जोडप्याचा विवाह झाला. 2018 मध्ये दोघे पालक झाले आणि त्यांच्या मुलाचे नाव इझान आहे.
अलीकडेच, सानियाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्याने मलिकपासून घटस्फोटाच्या बातम्यांना आणखी उत्तेजन दिले. माजी भारतीय टेनिस स्टारने लिहिले होते, “जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हृदयाची शांती भंग करते, तेव्हा ते सोडून द्या.”
गेल्या बुधवारीही तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि लिहिले, “लग्न कठीण आहे. घटस्फोट घेणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. लठ्ठपणा कठीण आहे. तंदुरुस्त राहणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. कर्जबाजारी होणे कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध असणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. संवाद अवघड आहे. संवाद न करणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. जीवन कधीही सोपे होणार नाही. हे नेहमीच कठीण असेल, परंतु आपण आपले कठीण निवडू शकतो. हुशारीने निवडा.” (Sania outside his marriage Shoaib Malik’s sister made a shocking revelation about her brother)
हेही वाचा
घटस्फोट शोएब मलिककडून मिळाला नाही! सानियाने निवडला वेगळा मार्ग, टेनिस स्टारच्या वडिलांची माहिती
Sania Mirza । शोएब मलिकने केलं तिसरं लग्न, दुसरी पत्नी सानिया मिर्झा म्हणाली….