Sanjay Bangar On Virat Kohli: टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम टप्पा, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दिसला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ते केले जे आजपर्यंत कोणताही भारतीय कर्णधार करू शकला नव्हता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पराभूत करणे हे भारतीय क्रिकेट संघासाठी स्वप्नासारखे होते. पण विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे हे स्वप्नही पूर्ण झाले.
विराटने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये पराभूत केले होते. विराट कसोटी क्रिकेटमधील भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक होता. मात्र, 2022 मध्ये विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. याबाबत आता भारताचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटलं आहे की, विराटने आणखी काही दिवस कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहायला पाहिजे होते.
विराटने आपल्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला कसोटीत किती पुढे नेले हे सर्वांनाच माहीत आहे. कोहलीचा कसोटी क्रिकेटमधील विजयाचा विक्रम इतर कर्णधारांच्या तुलनेत खूपच सरस होता. आता भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत ‘द राव पॉडकास्ट’वर बोलताना म्हणाले, “कोहलीने ज्या प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, मला वाटते की त्याने कर्णधारपदाचा कार्यकाळ वाढवायला हवा होता. त्याने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, मला वाटते की तो दीर्घकाळ कसोटी संघाचा कर्णधार राहू शकला असता.”
कसोटी क्रिकेट कर्णधारपदाची विराट कोहलीची आकडेवारी
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 68 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. या 68 सामन्यांपैकी भारतीय संघाने 40 सामने जिंकले होते. या काळात कोहलीची विजयाची टक्केवारी 58.82 होती. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018 मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पराभूत केले होते.
यानंतर विराटने आपल्या कर्णधारपदाखाली भारताला 2021 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नेले होते. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघाची कमान सांभाळली. पण आजही माजी क्रिकेटपटू कोहलीच्या नेतृत्व शैलीचे कौतुक करतात.
हेही वाचा –
“माझ्या मुलाला निवृत्तीबद्दल समजले असेल”, निवृत्तीनंतर मुलगा जोरावरबद्दल शिखर धवन भावूक
बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या
बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की