साल 2007 चा टी20 विश्वचषक अनेक क्रिकेट रसिंकाना लक्षात असेल. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने कमालीची शानदार कामगिरी केली होती. युवा खेळाडूंनी भरलेल्या भारतीय संघाने एमएस धोनी सारख्या नवख्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले होते. याच विश्वचषकामुळे धोनीतील नेतृत्वगुणाची चुणूक सर्वांना पाहायला मिळाले होते. आता धोनीच्या नेतृत्वाबद्दल भारताचे माजी निवडकर्ता संजय जगदाळे यांनी खास खुलासा केला आहे.
संजय जगदाळे यांनी सांगितले की 2007 टी20 विश्वचषकापूर्वीच त्यांना धोनीने खात्री दिली होती की, आम्ही विश्वचषक जिंकूनच येऊ.
एका इंटरव्यू दरम्यान संजय जगदाळे म्हणाले, ‘सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी क्रिकेटमधील या छोट्या प्रारूपामध्ये खेळण्यास नकार दिला होता. यानंतर दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने धोनीला कर्णधार बनवण्याबद्दल निर्णय घेतला.’
जगदाळे पुढे म्हणाले ,’2007 मध्ये मी निवडकर्ता होतो. मी भारतीय संघासोबतच इंग्लंडला होतो, जिथे आमची 7 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार होती. दिलीप मुख्य निवडकर्ता होता. आमची तेव्हाच टी20 विश्वचषकासाठी टीम मीटिंग झाली. सचिन, सौरव आणि राहुल यांनी स्पष्ट केले की आम्ही या विश्वचषकामध्ये खेळणार नाही. आम्ही एका युवा संघाची निवड केली. मी धोनीला कर्णधार बनवण्याचा सल्ला दिला व तसंच झालं.’
संजय जगदाळे म्हणाले, “7 सामन्यांची वनडे मालिका झाल्यानंतर मी ड्रेसिंग रूममध्ये धोनीला भेटलो. मी धोनीला सांगितले की आम्ही टी-20 विश्वचषकासाठी चांगली टीम निवडली आहे.’ त्यानंतर तात्काळ धोनीने प्रतिक्रिया दिली ,’सर आम्ही विश्वचषक जिंकून येऊ’ धोनीच्या या आत्मविश्वासाने मी हैराण झालो होतो,” असेही जगदाळे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टीव्ह स्मिथने थोपटली भारतीय फिरकीपटू आर अश्विनची पाठ; म्हणाला…
आनंद गगनात मावेना! क्रिकेट पाहताना चिमुकल्यांचा उत्साह कॅमेऱ्यात कैद, फोटो तुफान व्हायरल
मोठी बातमी! भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीसाठी असा असणार ऑस्ट्रेलियाचा ११ जणांचा संघ
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: विश्वचषकात भल्याभल्या क्रिकेटर्सला न जमलेला विक्रम करणारी ‘ती’ पहिलीच
गुडबाय २०२०: दिग्गज ५ खेळाडू ज्यांनी यावर्षी जगाचा निरोप घेत क्रीडा जगताला हेलावून सोडले