---Advertisement---

‘भारतीय संघ शाळकरी मुलांचा संघ आहे का?’, मांजरेकरांच्या ट्विटवर चाहत्याची तिखट प्रतिक्रिया

On: सोमवार, नोव्हेंबर 30, 2020 10:44 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने मालिका गमावली आहे. सिडनी येथे झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दोन्ही सामन्यांमध्ये अनुक्रमे ३७४ आणि ३८९ धावांचे डोंगर रचले. मालिका गमावल्यानंतर समालोचक आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी ट्वीट करत चाहत्यांना विचारले, नाणेफेकीमुळे दोन्ही सामने एकतर्फी झाले का? यानंतर, मांजरेकरांच्या या ट्विटखाली अनेक मजेशीर उत्तरे पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गाजवले भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व

संजय मांजरेकर यांच्या ट्विटवर चाहत्यांनी वेगवेगळी मते मांडली. कोणी मांजरेकरांशी सहमत असल्याचे मान्य केले. नाणेफेकीने दोन्ही सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे काहींनी सांगितले. भारतीय कर्णधार विराट कोहलीने दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजांना कोणतीही मदत मिळाली नाही. परिणामी, फिंच-वॉर्नर जोडीने दोन्ही वेळा शतकी भागीदारी केली. यानंतर, स्मिथ आणि मॅक्सवेलने मधल्या षटकांत जोरदार फलंदाजी करत, भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले.

चाहत्याने दर्शवली मांजरेकरांशी सहमती

एका चाहत्याने मांजरेकर यांच्या मताशी सहमती दर्शवताना म्हटले, ‘होय नक्कीच! नाणेफेक खूप महत्त्वाची ठरली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली असती, तर कदाचित निकाल वेगळे लागले असते. लक्ष्याचा पाठलाग करताना नेहमी संघांवर दबाव येतो.”

भारतीय संघ शाळकरी मुलांचा संघ आहे का?

एका चाहत्याने मात्र, मांजरेकर यांच्या या व्यक्तव्याशी असहमती दाखवली. त्याने तिखट प्रतिक्रिया देत लिहिले, “भारतीय संघ शाळकरी मुलांचा संघ आहे का? तुमच्याकडे संघात फलंदाज आणि गोलंदाज आहेत. तुम्हाला गरज पडेल तिथे सर्वोत्तम असणे आवश्यक आहे.”

https://twitter.com/imorati/status/1333261960125816832

भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी

सध्या सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारतीय गोलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दोन्ही सामन्यात मिळून फक्त एक बळी घेऊ शकला. मोहम्मद शमी धावा रोखण्यात अपयशी ठरला. युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हादेखील अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. युझवेंद्र चहलने दोन सामन्यात तब्बल १६० धावा लुटवल्या आहेत. मालिकेतील अखेरचा सामना कॅनबेरा येथे खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार

“विराटऐवजी रोहितला कर्णधार करण्याची वेळ आली?”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”

ट्रेंडिंग लेख-

भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज

या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---