भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) समालोचक समितीतून वगळण्यात आले आहे. या यादीतून त्यांना वगळण्याचा अर्थ असा आहे की ते यंदाच्या आयपीएलमध्येही समालोचन करु शकणार नाही.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिका मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मांजरेकर धरमशाला येथे उपस्थित नव्हते. याच कारणामुळे मांजरेकर यांची हकलपट्टी झाली असल्याची शक्यता आहे. हा सामना एकही चेंडू न टाकता पावसामुळे रद्द केला गेला होता. सुनील गावस्कर, व्हीव्हीएस लक्ष्मण, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि मुरली कार्तिक यांच्यासारख्या समितीचे समालोचक उपस्थित होते.
54 वर्षीय संजय मांजरेकर अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी मागील वर्षी प्रथम रवींद्र जडेजावर विविदात्मक टिप्पणी केली होती आणि त्यानंतर सहकारी समालोचक हर्षा भोगले यांच्याशी समालोचनादरम्यान वाद झाला होता. तथापि नंतर मांजरेकर या दोन्ही घटनांबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
ट्रेंडिंग बातम्या-
– Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग
– ब्लाॅग: १४ मार्च २००१ – असे खेळले वीर हे दोन!!!
…आणि द्रविड, लक्ष्मणने १९ वर्षांपुर्वी इतिहास घडवला!