इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व केले होते. या हंगामात त्याने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच निराश केले आहे. एवढेच नव्हे, तर या हंगामातील मागील पाचही सामन्यात त्याच्या संघाचा पराभव झाला.त्यामुळे संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली. यातच भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी निवडलेल्या सर्वोत्तम आयपीएल2020च्या संघातून विराटला डच्चू दिला आहे.
केएल राहुल आणि मयंक आहेत सलामीवीर
संजय मांजरेकर यांनी तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट आयपीएल संघातील खेळाडूंची नावे सांगितली आहेत. या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला डावाची दमदार सुरुवात करून देणारे केएल राहुल आणि मयंक अगरवाल या जोडीची मांजरेकर यांनी सलामीवीर म्हणून निवड केली आहे.
त्यांनी मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला तिसर्या क्रमांकावर स्थान दिले आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या ‘मिस्टर 360’ म्हणजेच एबी डिविलियर्सवर आहे. मांजरेकर यांनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज निकोलस पूरण याला संधी दिली आहे.
रोहित, धवन, कोहली यांना डच्चू
मांजरेकरांच्या या संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवनलाही स्थान मिळालेले नाही. ईएसपीएन क्रिकइन्फो वेबसाइटशी बोलताना ते म्हणाले की, “तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. सूर्यकुमार सारखा खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमध्ये आहे, ही चांगली बाब आहे. तो तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि मला असे वाटत नाही की तिसर्या क्रमांकावर त्याच्याव्यतिरिक्त कोणीही चांगली फलंदाजी केली आहे आणि सातत्य राखले आहे. चौथ्या क्रमांकावर एबी डिविलियर्स आहे, त्याच्या वयाचा काही फरक पडत नाही, तो आताही ऑल टाइम इलेव्हनचा भाग असेल.”
रशिद, चहल यांची फिरकीपटू म्हणून निवड
अष्टपैलू म्हणून अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकीपटू म्हणून राशिद खान आणि युझवेंद्र चहलचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांना मांजरेकर यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे.
मांजरेकर यांनी निवड केलेला संघ :
केएल राहुल, मयंक अग्रवाल, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स, निकोलस पुरण, अक्षर पटेल, राशिद खान, जोफ्रा आर्चर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या –
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर सेहवागने घेतली फिरकी, म्हणाला ‘काकांच्या कॉमेडीची आठवण येईल’
विराट कोहली आरसीबीचा कर्णधार आहे, हे तर आमचे भाग्यच, पाहा कोण म्हणतंय
वेळ पडली तर पंतप्रधान मोदींकडे करणार शमीच्या कुटुंबीयांची तक्रार, हसीन जहां भडकली
ट्रेंडिंग लेख
‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा