---Advertisement---

फलंदाज म्हणून हार्दिक ऐवजी ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे होती संधी, माजी भारतीय दिग्गजाचे वक्तव्य

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 6:50 PM
---Advertisement---

भारताचे माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकरांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारतीय संघाच्या निवडीवर मोठे वक्तव्य केले. भारतीय संघात हार्दिक पंड्याचा समावेश केला. मात्र, मनीष पांडेला स्थान दिले नाही.
त्यामुळे मांजरेकर या निवडीला योगायोग समजत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार मनिष पांडेला अंतिम अकरात संधी मिळायला हवी होती.

सध्या हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नाही आणि तो संघात फक्त हिटरच्या रूपाने खेळतो. त्यामुळे संजय मांजरेकर यांचे म्हणणे आहे की, जर हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार नाही, तर मग फक्त त्याला एक फलंदाज म्हणून खेळवणे योग्य नाही. जर हार्दिक पंड्याला खासकरून फलंदाज म्हणून खेळवायचा आहे, तर मग पांडे त्याच्यापेक्षा चांगला पर्याय आहे.

जर हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार नाही, तर मग मनीष पांडेला संधी मिळायला पाहिजे- संजय मांजरेकर

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्यापूर्वीच्या कार्यक्रमात बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, “हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नाही आणि फक्त फलंदाज म्हणून खेळत आहे. हे एक जुगाराप्रमाणे आहे, आणि आशा आहे की पद्धत काम करून जाईल. जडेजाला संघामध्ये जागा मिळू शकत होती. मी केवळ खासीयत असलेल्या खेळाडूंना घेवून अंतिम अकराचा संघ बनवण्यावर विश्वास ठेवतो. पांडे खूप दुर्दैवी आहे. खासियत असलेला फलंदाज असून सुद्धा त्याच्या जागी हार्दिक पंड्याला प्राधान्य दिले जाते.”

भारतीय संघात पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगल्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या अंतिम अकरा खेळाडूंचा संघ निवडला. तसेच पांडे, शुबमन गिल, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव सारख्या खेळाडूंना संधी मिळाली नाही.

भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ बाद ३७४ धावांचा विशाल डोंगर उभारला होता आणि भारतासमोर एक अवघड आव्हान ठेवले होते. यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दमदार शतकी खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…आणि मला पुन्हा लय सापडली’, ऑस्ट्रेलियन शतकवीराची मोठी प्रतिक्रिया

ऐकावे ते नवलंच! मुलाला बाद दिले म्हणून एका पंचाने दिली दुसऱ्या पंचाला धमकी

‘विश्वचषक २०१९ मधील चुकांची पुनरावृत्ती करू नका’, टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतमची ‘गंभीर’ प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---