सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतोय. या संघात वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकत, मुकेश कुमार व शार्दुल ठाकूर हे युवा गोलंदाज सांभाळत आहेत. अशात भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू व प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे. त्यांनी भारताच्या कसोटी संघात उमरान मलिक याचा समावेश करावा असे म्हटले.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर जसप्रीत बुमराह दुखापतीमूळे तर मोहम्मद शमी विश्रांतीमुळे गेलेला नाही. अशात युवा गोलंदाजच ही जबाबदारी पार पाडतील. मागील काही काळापासून भारतीय गोलंदाज विरोधी संघाच्या तळाच्या फलंदाजांना बाद करण्यात अपयशी ठरताना दिसलेत. त्यामुळे विरोधी संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतो. यात समस्येवर पर्याय म्हणून मांजरेकर यांनी उमरान याचा उल्लेख केला. ते म्हणाले,
“भारतीय संघ व्यवस्थापनाने उमरान याला वनडे व टी20 संघापेक्षा कसोटी संघात संधी द्यायला हवी. कारण विरोधी संघाचे 20 गडी बाद करण्याची कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच गरज असते. आपण यामध्ये काही वेळा अपयशी ठरतो. उमरान याला संधी दिली तर तो इंग्लंडच्या मार्क वूड याच्याप्रमाणे फायदेशीर ठरू शकतो.”
मार्क वूड हा सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत खेळताना दिसला होता. त्याने या सामन्यात सातत्याने 150 पेक्षा जास्तच्या वेगाने गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जेरीस आणले. उमरान देखील सातत्याने अशा प्रकारची गोलंदाजी करू शकतो. त्याने भारतासाठी वनडे व टी20 पदार्पण केले असले तरी कसोटी संघापासून तो दूर आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावरही तो वनडे व टी20 मालिका खेळताना दिसेल.
(Sanjay Manjrekar Suggest Team India Should Give Chance To Umran Malik In Test)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद