---Advertisement---

‘रोहित फक्त मायभूमीत खेळतो, त्याला संघात ठेवण्यात कसलाही अर्थ नाही,’ माजी क्रिकेटरची बोचरी टीका

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 3:17 PM
---Advertisement---

गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट चाहते भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज ही प्रतीक्षा संपेल. आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माबद्दल असं काही म्हटलं आहे, जे ऐकून रोहित शर्माच्या चाहत्यांना नक्कीच मिरची लागू शकते.

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे अनेकदा खेळाडूंवर टीका आणि वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून आले आहेत. नुकतेच इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांनी रोहित शर्मावर निशाणा साधला आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या एका स्तंभात त्यांनी लिहिले की, “एक कसोटी फलंदाज म्हणून रोहित शर्मासाठी ही मालिका त्याला घडवणारी किंवा त्याची कारकीर्द संपुष्टात आणणारी असेल. कारण अशा फलंदाजाला संघात ठेऊन काहीच फायदा नाही. जो ३४ वर्षांचा आहे ज्याने फक्त ४० कसोटी सामने खेळले आहेत आणि फक्त भारतात धावा केल्या आहेत.” (sanjay manjrekar’s Controversial statement on rohit sharma)

रोहितने २०१४ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळला होता, ज्यामधे त्याने ३४ धावांची खेळी केली होती. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु तो ३४ आणि ३० धावा करत माघारी परतला होता.

विश्वचषक २०१९ स्पर्धेत ६४८ धावा करणारा रोहित कसोटी क्रिकेटमध्ये मात्र साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने मागील काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. परंतु भारतात धावांचा पाऊस पडणाऱ्या रोहितला भारताबाहेर मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर देखील संकट येऊ शकते.

रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ३९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४६.२ च्या सरासरीने २६७९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, ‘हा’ फलंदाज दुखापतीमुळे बाहेर; बेयरस्टो घेणार जागा

सेव्ह द डेट! ‘या’ दिवशी टी२० विश्वचषकात होणार भारत-पाकिस्तानचा महामुकाबला

खराब फॉर्मात असलेल्या रहाणेची जागा धोक्यात! चौफेर फटकेबाजी करणारा ‘हा’ खेळाडू करू शकतो रिप्लेस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---