आज ट्विटरवर गुजरातचे निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी भारतीय संघातील मुस्लिम खेळाडूंच्या निवडीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे आणि यावर त्यांना भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने चोख प्रतिउत्तर दिले आहे.
बीसीसीआय निवड समितीने आज न्यूजीलँड विरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात गोलंदाज मोहम्मद सिराजला स्थान देण्यात आले आहे. तो एक मुस्लिम गरीब घरातील मुलगा आहे ज्याचे वडील रिक्षा चालवतात. त्यामुळे त्याच्यासाठी ही संधी म्हणजे स्वप्नवत आहे.
याबद्दल ट्विट करताना संजीव भट यांनी लिहिले आहे की “सध्या भारतीय संघात कोणता मुस्लिम खेळाडू आहे का? स्वातंत्र्य मिळाल्यापासून असं किती वेळा झालाय की भारतीय संघात एकही मुस्लिम खेळाडू नाही? मुस्लिम खेळाडूंनी काय खेळणं बंद केले आहे का? की निवडकर्ते दुसऱ्या खेळाचे नियम मान्य करायला लागले आहे?
क्या इस समय भारतीय क्रिकेट टीम में कोई मुस्लिम खिलाड़ी है ?
आज़ादी से आज तक ऐसा कितनी बार हुआ कि भारत की क्रिकेट… https://t.co/Nb6ufi71qX
— Sanjiv Bhatt (IPS) (@sanjivbhatt) October 22, 2017
यावर हरभजन सिंगने चोख प्रतिउत्तर देताना लिहिले आहे की “हिंदू ,मुस्लिम,शीख,इसाई सगळे भाऊ आहेत. क्रिकेट संघात खेळणारा प्रत्येक खेळाडू हिंदुस्तानी आहे. त्यांच्या जात किंवा रंगाविषयी कोणतेही वक्तव्य करणे चुकीचे आहे. (जय भारत)”
हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में है भाई। क्रिकेट टीम में खेलने वाला हर खिलाड़ी हिंदुस्तानी है उसकी जात या रंग की बात नहीं होनी चाहिए (जय भारत) https://t.co/UVvSHaLJdY
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 23, 2017
या दोन्हीही पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. संजीव भट यांच्या पोस्टवर तर खूप कठोर प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.