---Advertisement---

संजू सॅमसन अचानक KCL स्पर्धेमधून बाहेर? जाणून घ्या मोठं कारण समोर!

On: मंगळवार, सप्टेंबर 2, 2025 9:21 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा (Indian cricket team) स्टार विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) खूप दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो टीम इंडियासाठी आशिया कप 2025 (Asia Cup) मध्ये खेळताना दिसणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी संजू आपल्या मोठ्या भावाच्या नेतृत्वात केरळ क्रिकेट लीगमध्ये (KCL 2025) खेळत होता. पण त्यातच त्याने चालू हंगामात संघ सोडण्याचा निर्णय घेतला. कोच्ची ब्लू टायगर्ससाठी संजूने जबरदस्त कामगिरी केली होती.

केरळ क्रिकेट लीग 2025 मध्ये संजू सॅमसन कोच्ची ब्लू टायगर्ससाठी खेळत होता. त्याने फलंदाजीत शानदार कामगिरी केली होती. तरीही लीग स्टेजमध्येच संजूने टीम सोडली. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी 4 सप्टेंबरला दुबईसाठी रवाना होईल. त्यामुळे संजू कुटुंबासोबत 2 दिवस घालवून दुबईसाठी निघेल. इंग्लंडविरुद्धच्या मागील मालिकेत सॅमसन फलंदाजीत निराश केले होते. आता तो पुन्हा जबरदस्त कामगिरी करून टीममध्ये आपले स्थान मजबूत करू शकतो.

विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनने कोच्ची ब्लू टायगर्ससाठी 6 सामन्यांत 5 डावांत सरासरी 73.60 ने 368 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 186.80 होता. संजूने या स्पर्धेत 24 चौकार आणि 30 बाउन्सिंग षटकार मारले. त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकही झळकावली आहेत. आता संजू हाच फॉर्म आशिया कप 2025 मध्येही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानविरुद्ध मोठी पारी खेळून संजू सुपरस्टार बनू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---