---Advertisement---

‘नशीबवान आहोत, की आमच्याकडे तो आहे’, सॅमसनने गायले ‘या’ खेळाडूचे गुणगान

On: शनिवार, मे 28, 2022 1:36 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (२७ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थानने बेंगलोरचा ७ विकेट्सने पराभव करत त्यांना स्पर्धेबाहेर केले आणि अंतिम सामन्यांचे तिकीट मिळवले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याने (Jos Buttler) नाबाद शतकीय खेळी खेळली. त्याच्या या फलंदाजीने राजस्थान संघाने तब्बल १४ वर्षानंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या विजयाने आनंदहर्षित झालेल्या कर्णधार संजू सॅमसनने गोलंदाज आणि बटलर यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

“आम्ही खूप नशीबवान आहोत की, आमच्याकडे बटलर आहे. तसेच आमच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पिचवर चेंडू उसळी घेत होता याचा आम्हाला फायदा झाला”, अशा शब्दांत सॅमसनने सामन्यानंतर खेळाडूंचे कौतुक केले आहे.

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बटलरने या सामन्यात ६० चेंडूत नाबाद १०६ धावा केल्या. हे त्याचे या आयपीएल हंगामातील चौथे शतक ठरले आहे. यामुळे त्याने एका आयपीएल हंगामात सर्वाधिक शकत ठोकणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) विक्रमाशी बरोबरी केली आहे. कोहलीने २०१६च्या आयपीएल हंगामात चार शतके केली होती.

पंधराव्या आयपीएल हंगामात ऑरेंज कॅपवर आपला ताबा ठेवणाऱ्या बटलरने या सामन्यात १० चौकार आणि ६ षटकार फटकारत १७६.६७च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. यावेळी त्याने १६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर षटकार मारत या आयपीएल हंगामाच्या ८०० धावा पूर्ण केल्या आहेत.

या सामन्यात सॅमसनने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला योग्य ठरवत गोलंदाजांनी सलामीवीर कोहली आणि बेंगलोरचा कर्णधार फाफ डु प्लेसीस यांना झटपट बाद केले. राजस्थानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत रजत पाटीदार वगळता कोणत्याच फलंदाजाला फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. त्याने ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४२ चेंडूत ५८ धावा काढल्या.

या सामन्यात राजस्थानचे वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि ओबेड मॅकॉय यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. यावेळी बेंगलोरने २० षटकात आठ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी आलेल्या यशस्वी जायसवालने संघाला चांगली सुरूवात करून दिली. तर पुढे बटलरने त्याची तुफानी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका बजावली.

बटलरने या आयपीएल हंगामात १६ सामन्यांत ५८.८६च्या सरासरीने ८२४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

IPL प्लेऑफमध्ये वॉर्नरला पछाडत बटलरने दाखवला ‘जोश’! पाटीदारचाही विक्रमाच्या यादीत समावेश

बटलर मारण्यात अन् सिराज-हसरंगा षटकार खाण्यात आघाडीवर; RCBच्या गोलंदाजांचा नकोसा विक्रम

फायनलमध्ये चहलकडे इतिहास रचण्याची संधी, बनू शकतो सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---