---Advertisement---

आठवण वॉर्नची! १४ वर्षांनी IPL फायनलमध्ये गेल्यानंतर राजस्थानच्या बटलर, सॅमसनची भावूक प्रतिक्रिया; म्हणाले…

On: शनिवार, मे 28, 2022 3:15 PM
Shane-Warne-Sanju-Samson-and-Jos-Butller
---Advertisement---

पंधराव्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्याचे संघ निश्चित झाले आहेत. रविवारी (२९ मे) होणारा हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे हा सामना होणार आहे. गुजरातचा हा पहिलाच आयपीएल हंगाम असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात अंतिम सामना गाठला आहे. तसेच राजस्थानने तब्बल १४ वर्षानंतर अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

राजस्थानने शुक्रवारी (२७ मे) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्याच्या विजयानंतर नाबाद शतकीय खेळी करणारा जोस बटलर आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन शेन वॉर्नबाबत बोलताना भावूक झाले. वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने २००८मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद जिंकले होते. पण, त्याचे ४ मार्च २०२२ रोजी निधन झाले.

“वॉर्न हा राजस्थान संघाचा एक प्रतिभाशाली खेळाडू होता. पहिल्या हंगामात त्याने संघाला यश मिळवून दिले होते. त्याची आठवण येत आहे. पण, आज तो वरून आमच्याकडे अभिमानाने पाहत असेल”, असे बटलरने म्हटले आहे.

साल २००८च्या आयपीएल हंगामाच्या अंतिम सामन्यात लक्ष्मीपती बालाजीने टाकलेल्या शेवटच्या षटकात राजस्थानला आठ धावांची गरज होती. नंतर राजस्थानला विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती. चेन्नई विरुद्ध असलेला हा सामना त्यांनी तीन विकेट्सने जिंकला होता.

या सामन्याची आठवण काढत सॅमसन म्हणाला, “आयपीएलच्या पहिल्या हंगामावेळी मी केरळमध्ये १६ वर्षाखालील क्रिकेट खेळत होतो. त्यावेळी ती एक धाव सोहेल तन्वीरने वॉर्नसोबत काढली होती. हा विजयी क्षण मी कधीच विसरणार नाही.” तसेच तो असेही म्हणाला की, यंदाची आयपीएल शेन वॉर्नसाठी खेळत असून आता केवळ ट्रॉफीपासून एक पाऊल ते दूर आहेत.

बेंगलोर विरुद्धचा क्वालिफायर सामना राजस्थानने ११ चेंडू शिल्लक राखत आणि ७ विकेट्सने जिंकला. त्यापूर्वी बेंगलोरने रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या बळावर २० षटकात ८ गडी गमावत १५७ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना बटलरने ६० चेंडूत नाबाद १०६ धावा केल्या. यात त्याने ६ षटकार आणि १० चौकार मारले.

राजस्थानने साखळी सामन्यांतील १४ पैकी ९ सामने जिंकत गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले होते. त्यांना पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सकडून ७ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. यानंतरही त्यांनी जिद्द न हारता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तिन्ही विभागात चांगली कामगिरी करत या आयपीएल हंगामातील अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘नशीबवान आहोत, की आमच्याकडे तो आहे’, सॅमसनने गायले ‘या’ खेळाडूचे गुणगान

सामना हरला, पण मनं जिंकली! विराटने केले असं काही की होतंय सर्वत्र कौतुक; पाहा Video

तब्बल १०९ वर्षापासून ‘या’ गोलंदाजाचा विक्रम आहे अबाधित; एका दिवसात घेतलेल्या दोन हॅट्रिक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---