बुधवारी (दि. 5 एप्रिल) संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा धक्का बसला. पंजाब किंग्स संघाने आयपीएल 2023च्या 8व्या सामन्यात राजस्थानला 5 धावांनी पराभूत केले. या सामन्यात राजस्थानला पराभव पत्करावा लागला असला, तरीही कर्णधार संजूसाठी हा सामना खूपच खास ठरला. या सामन्यातच त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. यासह त्याने एमएस धोनी याचा विक्रमही मोडीत काढत तो राजस्थानचा सर्वात यशस्वी फलंदाज बनला.
संजू सॅमसन राजस्थानचा सर्वात यशस्वी फलंदाज
संजू सॅमसन (Sanju Samson) याने पंजाब किंग्स संघाविरुद्ध 25 चेंडूत 42 धावांची वादळी फलंदाजी केली. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 5 चौकारही मारले. त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही, पण तो राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. तो राजस्थानसाठी 118 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 30.46च्या सरासरीने आणि 137.99च्या स्ट्राईक रेटने 3138 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 18 अर्धशतकेही निघाली आहेत. त्याने याबाबतीत अजिंक्य रहाणे याला मागे टाकले आहे. त्याने 106 सामन्यात 35.60च्या सरासरीने आणि 122.30च्या स्ट्राईक रेटने 3098 धावा केल्या होत्या. यानंतर यादीत शेन वॉटसन (2474), जोस बटलर (2378) आणि राहुल द्रविड (1324) यांचा क्रमांक लागतो.
संजू सॅमसनच्या कर्णधार म्हणून 1000 धावा
फक्त एवढंच नाही, तर या खेळीसह सॅमसन कर्णधार म्हणून सर्वात वेगवान 1000 धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला. त्याने 33 डावात ही कामगिरी केली. तसेच, त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने 37 डावात कर्णधार म्हणून 1000 धावा केल्या होत्या. तो 8व्या स्थानी आहे.
या बाबतीत सर्वात पुढे केएल राहुल आहे. त्याने 22 डावात ही कामगिरी केली आहे. या हंगामात संजू सॅमसन शानदार लयीत दिसत आहे. त्याने पहिल्या सामन्यातही 54 धावांची खेळी केली होती.
सॅमसन ज्याप्रकारे धावांचा पाऊस पाडत आहे, त्याने बीसीसीआयचे टेन्शन वाढवले आहे. सॅमसन त्याच्या फलंदाजीने यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक संघासाठी दावेदारी ठोकू शकतो. बीसीसीआयसाठी त्याला दुर्लक्षित करणे सोपे राहणार नाही. तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. (Sanju Samson becomes the first Rajasthan Royals captain to complete 1000 runs in IPL and surpass ms dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शार्दुल ठाकूरने सुहानालाही पाडली भुरळ! विजयानंतर केकेआरची मालकिन म्हणाली…
घातक इंग्लिश गोलंदाजाची आयपीएलमधून माघार, आरसीबी पर्यायी खेळाडूच्या शोधात