आयपीएल 2023 मध्ये यशस्वी जयस्वाल वादळी फॉर्ममध्ये दिसला. हाच फॉर्म त्याने गुरुवारी (11 मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही कायम ठेवला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर केकेआरला राजस्थान रॉयल्सकडून 9 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. सामन्याचा निकाल 13व्या षटकात लागला असता, पण संजू सॅमसनने दाखवलेल्या दिलदारपणामुळे राजस्थानला विजयासाठी एक चेंडू अधिकचा लागला.
राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला यजमान कोलकाता नाईट रायडर्स संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 149 धावा करू शकला. विजयासाठी राजस्थानला 150 धावांचे आव्हान मिळाले होते, जे त्यांनी अवघ्या 13.1 षटकात गाठले. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) सामन्याचा हिरो ठकला. पण संजू सॅमसन (Sanju Samson) यानेही मैफिल लुटली. जयस्वालने 47 चेंडूत 98* धावा केल्या, तर सॅमसनने 29 चेंडूत 48* धावा कुटल्या.
तेराव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर संजू सॅमसन स्ट्राईकवर होता. विजयासाठी राजस्थानला 3 धावा हव्या होत्या. सोबतच सॅमसनला अर्धशतकासाठी फक्त 2 धावा हव्या होत्या. पण सुयश शर्माने टाकलेला हा चेंडू सॅमसनने प्लेट केला आणि एकही धाव घेतली नाही. परिणामी पुढच्या षटकात जयस्वाल स्ट्राईकवर येणार होता. यावेळी जयस्वाल 94 धावांसह खेळत होता आणि शतकासाठी त्याला अजून 6 धावांची आवश्यकता होता. अशात पुढच्या षटकात स्ट्राईकवर आल्यानंतर जयस्वाल षटकार मारेल, अशी सॅमसनला अपेक्षा होती. शेवटचा चेंडू निर्धाव खेळल्यानंतर सॅमसनने जयस्वालकडे पाहून दोन्ही हात हवेत वर केले आणि “षटकार मार” अशा इशारा केला. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून सॅमसनचे कौतुक मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
150 runs chased down in just 13.1 overs. @rajasthanroyals have won this in a jiffy with Yashasvi Jaiswal smashing an incredible 98* from just 47 balls.
Scorecard – https://t.co/jOscjlr121 #TATAIPL #KKRvRR #IPL2023 pic.twitter.com/2u0TiGPByI
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
असे असले तरी, जयस्वाल सॅमसनच्या आपेक्षा पूर्ण करू शकला नाही. शेवटच्या चेंडूवर जयस्वालने षटकार मारू शकला नाही आणि त्याचे शतक देखील हुकले. शेवटच्या चेंडूवर जयस्वालला षटकार मारता आला नाही, पण त्याने चौकार मारला. परिणामी नाबाद 98 धावांचे योगदान जयस्वालला देता आले. या सामन्यात जयस्वालने अवघ्या 13 चेंडूत म्हणजेच आयपीएलचे सर्वात वेगवान अर्धशतक देखील ठोकले. यापूर्वी हा विक्रम केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांच्या नावावर होता, ज्यांनी प्रत्येकी 14-14 चेंडूत अर्धशतके ठोकली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
KKRच्या कॅप्टनवर 21 वर्षीय जयसवाल पडला भारी! पहिल्याच ओव्हरमध्ये जाम धुलाई करत रचला रेकॉर्ड
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! बाऊंड्री लाईनवर धावत हेटमायरने पकडला अचंबित करणारा कॅच, व्हिडिओ पाहाच