भारताचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. या दौऱ्यात भारतीय संघाला संमिश्र यश मिळाली. वनडे मालिका भारताने जिंकली, मात्र त्यानंतर टी२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत अनेक युवा खेळाडू भारताकडून खेळताना दिसले. अनेकांनी या दौऱ्यात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले, तर अनेक जण आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे या दौऱ्यात खेळलेल्या खेळाडूंबद्दल अनेक माजी क्रिकेटपटू चर्चा करताना दिसत आहे.
त्यातही या दौऱ्यादरम्यान सर्वांचेच लक्ष संजू सॅमसनकडे होते. ६ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सॅमसनला या श्रीलंका दौऱ्यात वनडे क्रिकेटमध्येही पदार्पणाची संधी मिळाली. त्याला काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असल्याने अनेकांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, तो या दौऱ्यात मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्यावर टीकाही सध्या होत आहे.
नुकतेच माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी टीका करत म्हटले आहे की, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने सुवर्णसंधी गमावली आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारताचे प्रमुख खेळाडू उपस्थित नसताना,संजूला स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी होती,पण ती त्याने गमावली आहे.
भारताचा कसोटी संघ जून महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये आहेत. याच कारणामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली होती. मात्र, या संधीचा फायदा घेण्यात सॅमसनला अपयश आले.
26 वर्षीय संजूने या दौऱ्याच आपल्या वनडे पदार्पणात 46 धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या होत्या. पण त्याने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 27 तर दुसर्या सामन्यात 7 धावा केल्या. तसेच तिसऱ्या सामन्यात तर त्याला खातेही उघडता आले नाही. यष्टीरक्षणातही त्याने विशेष कामगिरी केली नाही. त्यामुळे आपल्या टीकाकारांना उत्तर देण्याची मोठी संधी त्याने गमावले आहे असे आकाश चोप्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे.
सॅमसन आत्तापर्यंत कारकिर्दीत 10 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळला असून, ज्यात त्याला 11.70 च्या सरासरीने केवळ 117 धावा करता आल्या आहेत. त्याची 27 धावांची सर्वोच्च खेळी आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात त्याने ही खेळी केली होती.
महत्वाच्या बातम्या
–रिषभ पंतने ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीशी संबंधीत खास घटनेचा केला खुलासा, म्हणाला…
–भारताचे असे ४ स्टार क्रिकेटर जे लवकरच घेऊ शकतात टी२० क्रिकेटमधून निवृत्ती
–‘राहुल चाहर मला राशिद खानची आठवण करून देत आहे’, पाहा कोणी केलीये तुलना