सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेला भारतीय संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. यजमान संघाविरुद्ध सुरू असेलली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका शनिवारी (२० ऑगस्ट) भारताने नावावर केली. भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर दुसरा सामना देखील ५ विकेट्स राखून जिंकला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारही दिला गेला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर सॅमसनने खास प्रतिक्रिया दिली.
संजू सॅमसन (Sanju Samson) या सामन्यात ३९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावांचे योगदान देऊ शकला. केएल राहुल (१) आणि इशान किशन (६) स्वस्तात बाद झाल्यानंतर सॅमसनने डाव सांभाळला आणि सामन्याचा शेवट देखील केला. देशासाठी चांगले प्रदर्शन करता आल्यामुळे सॅमसन आनंदी आहे. त्याने बोलताना भारतीय गोलंदाजांचे देखील कौतुक केले. दरम्यान, ही पहिलीच वेळ जेव्हा सॅमसन भारताचे प्रतिनिधित्व करताना सामनावीर ठरला आहे.
“तुम्ही मध्ये कितीही वेळ घालवा, यामुळे (देशासाठी खेळल्यामुळे) चांगले वाटते. देशासाठी असे करणे (चांगले प्रदर्शन) अजून खास बाब आहे. मी तीन झेल घेतले, पण स्टंपिंग करताना चुकलो. मी यष्टीरक्षण आणि फलंदाजीचा आनंद घेत आहे. मला वाटते की ते (भारतीय गोलंदाज) खरोखर चांगली गोलंदाजी करत आहेत. माझ्या हातात अनेक चेंडू आले आहेत.” शार्दुल ठाकुरने या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वे संघ प्रथम फलंदाजी करताना ३८.१ षटकात १६१ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य २५.४ आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. या विजयानंतर भारतीय संघाने या एकदिवसीय मालिकेत ०-२ अशी विजयी आगाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सोमवारी म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. पहिले दोन सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळले गेले असून तिसरा सामना देखील याच ठिकाणी पार पडेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
संजू.. संजू.. स्टेडियममध्ये सुरू होती नारेबाजी, मग सॅमसनने केले असे काही की चाहते झाले फिदा!
मन जिंकलस! कँसर पिडीत चिमुकल्याची मागणी केली झटक्यात पूर्ण, त्याक्षणी संजू झाला इमोशनल
कसोटी चॅम्पियनशीपची फायनल ऑस्ट्रेलिया अन् दक्षिण आफ्रिकाच खेळणार! माजी दिग्गजाची भविष्यवाणी