इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणारा भारताचा युवा फलंदाज संजू सॅमसन मैदानावर शांत राहून गोलंदाजांना आपल्या आक्रमक फलंदाजीने उत्तर देत असतो. मात्र, सोशल मीडियावर त्याचा वेगळाच अवतार दिसला. ज्यामध्ये त्याने आपला संघ सहकारी वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या प्रश्नावर गमतीशीर प्रत्युत्तर दिले. त्याच्या स्वभावाच्या या नव्या पैलूवर चाहत्यांनी अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संजूचा हजरजबाबीपणा
संजूने सोमवारी (२८ जून) बसमध्ये बसतानाचे आपले छायाचित्र शेअर केले. ज्यावर दीपक चाहरने संजूला विनोदी पद्धतीने उत्तर दिले. हे पाहून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. २६ वर्षीय सॅमसनने भारतीय संघाची किट परिधान करून एक सेल्फी अपलोड केला. श्रीलंकेला जाण्यासाठी तयारी करीत असल्याचे सांगण्याच्या प्रयत्नात त्याने श्रीलंकेच्या ध्वजासह विमानाचा इमोजी जोडला.
https://www.instagram.com/p/CQp5I0Vlu9e/?utm_source=ig_embed&ig_rid=2862a2a3-2c07-404b-ba81-0b4ca89261f1
दीपक चाहर याने यावर कमेंट करताना लिहिले, ‘कुठे?’ त्यावर संजू सॅमसनने तत्काळ उत्तर देतांना लिहिले, ‘मी मागे बसलोय, ये इकडे.’ संजू आणि दीपक चाहर हे श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग आहेत. संजूने ही पोस्ट केली तेव्हा ते दोघे एकाच बसमध्ये होते. दीपकने कमेंट करत संजूची मजा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजूने आपल्या विनोदबुद्धीने उत्तर देत त्याचे तोंड बंद केले. अनेक चाहत्यांनी या संभाषणावर प्रतिक्रिया देत, संजूच्या हजरजबाबीपणाचे कौतुक केले.
श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे भारतीय संघ
भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना शिखर धवनच्या नेतृत्वात युवा भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या २० सदस्य संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यावर तीन वनडे व तीन टी२० सामने खेळले जातील. १३ जुलैपासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ: धक्कादायक! श्रीलंकन खेळाडूंची बायो बबलचे नियम तोडून इंग्लंडच्या रस्त्यांवर मजा
बाजीगर! गोष्ट पाच तासांत तीन सुवर्ण जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची
देशाचे दुर्दैव! आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू विकतोय चहा