fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अच्छा! तर हा आहे चेन्नईविरुद्ध सामनावीर ठरलेल्या सॅमसनच्या यशाचे गमक

Sanju Samson spells out his success

September 23, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात काल (२२ सप्टेंबर) पार पडला. हा सामना राजस्थानने १६ धावांनी जिंकला. राजस्थानच्या या विजयामध्ये धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनने मोलाची कामगिरी केली.

सामनावीर बनल्यानंतर सॅमसन म्हणाला की, मी माझ्या फीटनेसवर लक्ष देत आहे. याव्यतिरिक्त त्याने अनेक पैलूंबद्दलही चर्चा केली.

सॅमसनने सांगितले आपल्या यशामागील मंत्र

जेव्हा कोणताही चेंडू त्याच्या क्षेत्रात पडतो, तेव्हा तो मोठ- मोठे फटके खेळायला मागे- पुढे पाहत नाही, असे तो आपल्या खेळीबद्दल बोलताना म्हणाला.

सामना झाल्यानंतर तो आपल्या यशामागील तंत्राबद्दल सांगताना म्हणाला, “माझा गेम प्लॅन हा स्टँड आणि डिलीव्हर आहे. जर चेंडू माझ्या रडारमध्ये असेल, तर मी मोठे फटके मारतो. सोबतच जर टी२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करायची असेल, तर खराब चेंडू मारण्याची ताकद ठेवणेही महत्त्वपूर्ण आहे. मी माझ्या फीटनेस, डाएट, ट्रेनिंग आणि आपल्या ताकदीवर खूप मेहनत घेत आहे. कारण माझा खेळ मोठे फटके मारण्यावर अवलंबून असतो.”

“मला वाटते की, या पिढीमध्ये खेळाची हीच मागणी आहे. माझ्याकडे या ५ महिन्यांत स्वत:च्या फीटनेसवर काम करण्यासाठी वेळ होता. आणि मला वाटते की मी ती क्षमता वाढविली आहे. आम्ही चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणल्यामुळे आनंदी आहोत. आणि आशा आहे की आम्ही पुढेही असंच करत राहू,” असेही सॅमसन पुढे म्हणाला.

तुफान खेळी खेळून सॅमसन बनला सामनावीर

सॅमसनने चेन्नईविरुद्ध ३२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली होती. ही खेळी केल्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

यादरम्यान सॅमसनने केवळ १९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यासोबतच चेन्नईविरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये सॅमसनने केएल राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मागील वर्षी मोहाली येथे राहुलने चेन्नईविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.

सॅमसनने केलेल्या ७४ धावांमध्ये १ चौकार आणि तब्बल ९ षटकारांचा समावेश होता. सॅमसनच्या या खेळीमुळेच राजस्थान संघाने २०० पेक्षाही अधिक धावांपर्यंत मजल मारली.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाहा तर स्मिथ काय म्हणतोय, धोनी- फाफने शेवटच्या षटकात चांगले शॉट्स ठोकले, पण…

-क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता करता येणार वानखेडे स्टेडियमची सफर

-‘या’ गोष्टीमुळे गमवावा लागला सामना, राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीची प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख-

-चेन्नई-राजस्थान सामन्यात बनले मोठे विक्रम, संजू सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद

-मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी 

-दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम


Previous Post

वॉर्नरच्या हैदराबादला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू पडला आयपीएल बाहेर

Next Post

फक्त ९० धावा आणि मुंबईचा कर्णधार रोहित घालणार ‘या’ शानदार विक्रमाला गवसणी

Related Posts

Photo Courtesy: MS File Photo
टॉप बातम्या

ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त ‘इतके’ दिवस

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricket.com.au
टॉप बातम्या

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील खेळपट्ट्यांना आयसीसीने दिली रेटिंग, ३६ धावांत भारताचा डाव आटोपलेली खेळपट्टी ठरली…

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बेअरस्टोने केली ‘जादू’! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
टॉप बातम्या

एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ‘ही’ विक्रमी कामगिरी

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

SL vs ENG : दुसर्‍या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

फक्त ९० धावा आणि मुंबईचा कर्णधार रोहित घालणार 'या' शानदार विक्रमाला गवसणी

Photo Courtesy: www.iplt20.com

लिलावात २ करोड मिळालेला क्रिकेटर आयपीएलमधून बाहेर

Photo Courtesy: www.iplt20.com

धोनीने ‘या’ कारणासाठी घातला होता पंचाशी वाद, पण...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.