fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चेन्नई-राजस्थान सामन्यात झाले मोठे विक्रम, सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद

9 Records Made In CSK Vs RR Match

September 23, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


बहुप्रतिक्षीत आयपीएल २०२० चा हंगाम अखेर १९ सप्टेंबरपासून सुरु झाला. या हंगामातील चौथा सामना मंगळवारी शारजाहमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा १६ धावांनी पराभव केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ विकेट्स गमावत २१६ धावा केल्या. चेन्नई राजस्थानच्या २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकात ६ विकेट्स गमावत केवळ २०० धावाच करु शकला.

परंतु, अतिशय रोमांचक ठरलेल्या या सामन्यात एकाहून एक दमदार विक्रमांची नोंद झाली आहे. या लेखात आम्ही त्याच विक्रमांचा आढावा घेतला आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यातील खास आकडेवारी (9 Records Made In CSK Vs RR Match) –

१) राजस्थान संघाचा हा चेन्नईविरुद्ध ८वा विजय होता. यापुर्वी दोन्ही संघात एकूण २१ सामने झाले आहेत. त्यातील १४ सामने चेन्नईने जिंकले, तर राजस्थानने ७ सामने खिशात घातले होते.

२) राजस्थानचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ११ अर्धशतक ठोकले. त्याने ३२ चेंडूत ७४ धावांची दमदार खेळी केली. यात त्याच्या एका चौकाराचा आणि ९ षटकारांचा समावेश होता.

३) राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील ९वे अर्धशतक ठोकले. त्याने ४७ चेंडूत ६९ धावांची शानदार खेळी केली होती. यात त्याच्या ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

४) या सामन्यात सॅमसन ९ षटकार मारत, आयपीएलच्या एका डावात २ वेळा ९ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा पहिला आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. यापुर्वी त्याने २०१८मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातील डावात १० षटकार ठोकले होते.

५) चेन्नईचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट लुंगी एन्गिडी याने राजस्थानच्या डावातील शेवटच्या म्हणजे २०व्या षटकात तब्बल ३० धावा दिल्या. यासह त्याने आयपीएलच्या २०व्या षटकात अतिशय खराब गोलंदाजी करण्याचा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

त्याच्या व्यतिरिक्त नुकताच किंग्स इलेव्हन पंजाबचा ख्रिस जॉर्डन याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३० धावा देत हा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर २०१७ साली राइझिंग पुणे सुपरजायंट्सचा अशोक दिंडा याने मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटच्या षटकात ३० धावा दिल्या होत्या.

६) चेन्नई संघाविरुद्ध एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे संघ-

कोलकाता नाईट रायडर्स (चेन्नई, २०१८) – १७ षटकार

राजस्थान रॉयल्स (शारजाह, २०२०) – १७ षटकार

७) राजस्थान रॉयल्स संघाकडून सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज

जोस बटलर – १८ चेंडूत  (दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, २०१९)

ओविस शहा – १९ चेंडूत (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०१२)

संजू सॅमसन – १९ सप्टेंबर (चेन्नई सुपर किंग्स, २०२०)

८) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज

केएल राहुल – १९ चेंडू (२०१९)

संजू सॅमसन – १९ चेंडू (२०२०)

डेव्हिड वॉर्नर – २० चेंडू (२०१५)

९) आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा सर्वोत्तम स्कोर

५ बाद २२३ धावा – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (चेन्नई, २०१०)

४ बाद २१७ धावा – विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (बेंगलोर, २०१८)

७ बाद २१७ धावा – विरुद्ध डेक्कन चार्जर्स (हैद्राबाद, २००८)

७ बाद २१६ धावा – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (शारजाह, २०२०)

ट्रेंडिंग लेख –

मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी 

दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम

‘या’ ३ फलंदाजांचे ट्वेंटी२०मध्ये आहे मोठे नाव, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर करता आले नाही एकही अर्धशतक

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ गोष्टीमुळे गमवावा लागला सामना, राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीची प्रतिक्रिया

पुन्हा एकदा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने घातला पंचाशी वाद, ‘हे’ आहे कारण

तू वरच्या क्रमांकावर फलंदाजीला का येत नाही? धोनीने दिले ‘हे’ उत्तर


Previous Post

पाहा तर स्मिथ काय म्हणतोय, धोनी- फाफने शेवटच्या षटकात चांगले शॉट्स ठोकले, पण…

Next Post

जे धोनीला जमलं नाही, ते संजू सॅमसननं करुन दाखवलं

Related Posts

क्रिकेट

आर आश्विनने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रींची केली नक्कल, बघा व्हिडिओ 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

मोहम्मद सिराजला ५ विकेट्स मिळाव्या म्हणून ‘या’ खेळाडूने देवाकडे केली होती प्रार्थना 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BBL
क्रिकेट

दिल्ली संघाने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झळकावले ‘त्याने’ शानदार शतक

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC and WWE
क्रिकेट

ट्रिपल एच म्हणतोय, ‘…तर मी असतो दुसरा सचिन तेंडुलकर’

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत बांगलादेशची मालिकेत विजयी आघाडी

January 22, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

जे धोनीला जमलं नाही, ते संजू सॅमसननं करुन दाखवलं

Photo Courtesy: Twitter/ BCCI

१३ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजाने केले होते 'ऑस्ट्रेलिया' संस्थान खालसा

हॉटस्पॉट आणि स्निकोमीटर; नक्की भानगड आहे तरी काय भाऊ?

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.