भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना सेंच्युरियन मैदानावर खेळला जात आहे. भारताचा स्टार फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) टी20 मध्ये सलग 2 शतके झळकावली होती. टी20 मध्ये सलग शतके झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. पण तो अचानकच ‘हिरो मधून झिरो’ झाला. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात तो शून्यावर झाला दरम्यान त्याच्या नावावर लाजिरवाणा रेकाॅर्ड झाला आहे.
तिसऱ्या टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसन (Sanju Samson) मैदानात उतरताच तो खाते न उघडता क्लीन बोल्ड झाला. सलग 2 सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाल्याने, संजू हा भारतीय यष्टीरक्षक ठरला जो सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला. 17 सामन्यांत त्याने 0 वर 5 वेळा विकेट गमावली आहे. यापूर्वी हा रेकाॅर्ड रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नावावर होता, जो 54 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 वेळा शून्यावर बाद झाला होता.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा शून्यावर बाद (डाव)-
12 – रोहित शर्मा (151 डाव)
7 – विराट कोहली (117 डाव)
6 – संजू सॅमसन (32 डाव)
5 – केएल राहुल (68 डाव)
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय खेळाडू-
5- संजू सॅमसन
3- युसूफ पठाण
3- रोहित शर्मा
3- विराट कोहली
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिका- रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मारक्रम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिपामला
महत्त्वाच्या बातम्या-
“या 4 खेळाडूंमुळे माझ्या मुलाचे 10 वर्ष क्रिकेट करिअर उध्वस्त…” संजूच्या वडिलांचे खळबळजनक वक्तव्य
IND vs SA; 27 वर्षीय भारतीय खेळाडूने केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण…!
IPL Mega Auction 2025; मुंबईने सोडलेल्या ‘या’ 3 खेळाडूंना चेन्नई करणार टार्गेट?