भारत आणि बांग्लादेश यांच्यातील आज रविवारपासून (06 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत चाहत्यांना अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. सूर्यकुमार यादवने सामन्याच्या पूर्वसंध्येला अनेक संकेत दिले आहेत. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. संजू सॅमसन टी20 मालिकेत अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करेल. असे सूर्यकुमार यादवने म्हटले आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध 2015 मध्ये पदार्पण करणारा संजू सॅमसन गेल्या नऊ वर्षांत संघाचा नियमित सदस्य नाही. त्याला सातत्यपूर्ण संधी न मिळाल्याने त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. “संजू सॅमसन खेळेल आणि अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करेल,” असे भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार याने ग्वाल्हेरमध्ये मालिकेच्या सलामीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
संजू सॅमसनबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी आतापर्यंत 30 टी20 सामने खेळले असून, त्याने पाच वेळा डावाची सुरुवात केली आहे. मात्र, सॅमसनने टॉप ऑर्डरवर धावा केल्या नाहीत. मात्र त्याने 2022 मध्ये आयर्लंडविरुद्ध दमदार 77 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनकडे बांग्लादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत टी-20 संघात आपले स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधी आहे. टी20 विश्वचषकाची पुढील आवृत्ती दोन वर्षांनंतर खेळवली जाणार आहे आणि सॅमसनला या मालिकेत सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करून संघात आपले स्थान पक्के करण्याची संधी आहे.
बांग्लादेश मालिकेसाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
हेही वाचा-
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे गोलंदाज, टॉप-5 मध्ये दोन भारतीयांचा समावेश
“रोहित शर्मा आरसीबीमध्ये जाणार का?”, एबी डिव्हिलियर्सचं सूचक वक्तव्य; हार्दिकचाही उल्लेख
भारतासाठी सुपर संडे! महिलांसह पुरूष संघ ॲक्शनमध्ये