---Advertisement---

संजू सॅमसननं जिंकलं चाहत्यांच हृदय…!!! पहिल्याच टी20 सामन्यात केलं असं काहीतरी…

On: रविवार, जुलै 28, 2024 4:16 PM
suryakumar yadav
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिला टी20 सामना (27 जुलै) रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतानं 43 धावांनी शानदार विजय मिळवला. तत्पूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक खेळाडू संजू सॅमसनला (Sanju Samson) पहिल्या टी20 सामन्यात संधी मिळाली नव्हती. भारतानं हा सामना जिंकला. परंतू हा सामना संपल्यानंतर संजूनं चाहत्यांचं मन जिंकलं.

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) निःसंशयपणे आंतरराष्ट्रीय संघात आहे आणि तो नेहमी संघाच्या आत-बाहेर होत असतो. परंतू त्याचं चाहते आश्चर्यकारक आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. त्याचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर बाहेरही आहेत. हे आपण आयर्लंडमध्येही पाहिले आहे. सॅमसन सध्या श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासोबत आहे आणि तिथेही संजूचे खूप चाहते आहेत.

संजू सॅमसनचे (Sanju Samson) लाखो चाहते आहेत. श्रीलंकेतील स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या चाहत्यांवरुन याचा अंदाज येतो. सॅमसनला पहिल्या टी20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्याने चाहत्यांना निराश होऊ दिले नाही. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यादरम्यान तो स्टेडियममध्ये चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसला. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंका दौऱ्यावर भारत 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारताच्या टी20 संघात संजूची निवड झाली आहे. परंतू भारताच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. संजूनं भारतासाठी 16 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 56.66च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 99.60 राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3 अर्धशतक आणि 1 शतक आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा वाढली! रमिता जिंदाल फायनलमध्ये दाखल
पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना दिले प्रोत्साहन, ‘मन की बात’मध्ये पॅरिस ऑलिम्पिकचा उल्लेख
“हार्दिक पांड्याला कर्णधार न करण्याचा निर्णय योग्य” माजी क्रिकेटपटूचं खळबळजनक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---