भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) पाकिस्तानचे दिग्गज फिरकी गोलंदाज सक्लेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांनी कौतुक केले आहे.
सक्लेन आणि गांगुली बर्याच वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत आणि आता पाकिस्तानच्या या माजी फिरकी गोलंदाजीने गांगुलीबरोबर खेळलेली जुनी आठवण शेअर केली आहे.
42 वर्षीय सक्लेन यूट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये म्हणाले की, “जेव्हा इंग्लंड दौरा केला तेव्हा मी ससेक्सकडून खेळायचो. तेव्हा भारतीय संघाचा ससेक्सबरोबर तीन दिवसांचा सराव सामना होता आणि त्या सामन्यात गांगुली खेळत नव्हता.”
“माझ्या मते ही घटना 2005-06 या वर्षातील होती. माझ्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि मी जवळजवळ 36-37 आठवडे अंथरुणावर पडलो होतो,” असे सक्लेन यावेळी म्हणाले.
पाकिस्तानकडून 49 कसोटी आणि 169 वनडे सामन्यांमध्ये अनुक्रमे 208 आणि 288 विकेट्स घेणारे फिरकीपटू सक्लेन म्हणाले की, “मी शस्त्रक्रियेनंतर परतलो होतो आणि सौरव तो सामना पहायला आला. ससेक्सचा संघ फलंदाजी करत होता आणि सौरवने ससेक्सच्या बाल्कनीकडे पाहिले.”
“गांगुली ड्रेसिंग रूममध्ये आला आणि त्याने मला कॉफी दिली आणि माझा गुडघा आणि माझ्या कुटुंबाची विचारपूस केली. मग आम्ही बोलू लागलो. तो सुमारे 40 मिनिटे माझ्याबरोबर बसला आणि यावेळी त्याने माझे मन जिंकले,” असेही सक्लेनने यावेळी सांगितले.
कारकीर्दीत 113 कसोटी आणि 311 वनडे सामने खेळलेला गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहेत. त्याने शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुर येथे खेळला होता.
पॅट कमिन्सच्या प्रेयसीने सांगितला आयपीएल लिलावातील पैसे खर्च करण्याचा प्लॅन
वाचा- ????https://t.co/CSBKpGxKy0????#म #मराठी #Cricket #IPL2020 @Mazi_Marathi
@MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 26, 2019
बॉक्सिंग डे कसोटीसाठी न्यूझीलंड संघात दोन मोठे बदल
वाचा- ????https://t.co/u1MIZMwHuS????#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi
@MarathiRT #BoxingDayTest— Maha Sports (@Maha_Sports) December 26, 2019