स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळाडूंइतकेच प्रशिक्षकांना देखील महत्त्व असते. अनेकदा विविध संघांच्या कर्मचारी गटामध्ये फिजिओ किंवा महिला दिसतात. मात्र, आता प्रसिद्ध ससेक्स काउंटीच्या पुरुष संघाला इंग्लंडची माजी यष्टीरक्षक सारा टेलर ही प्रशिक्षण देताना दिसणार आहे. ससेक्स काउंटीने टेलरला आपल्या कोचिंग क्लासमध्ये सामील करून घेतल्याची नुकतीच अधिकृत घोषणा केली.
नियुक्तीनंतर सारा म्हणाली…
ससेक्स काउंटीसोबत जोडले गेल्यानंतर साराने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, “ससेक्स संघांमध्ये चांगले यष्टिरक्षक आहेत. मी माझ्या अनुभवाचा आणि कौशल्यांचा योग्य वापर करून ससेक्सच्या यष्टिरक्षकांना फायदा करुन देईल. मला अभिमान आहे की, मी एका ऐतिहासिक संघाचा भाग बनले आहे.”
सारा ही कोणत्याही पुरुष काउंटी संघाच्या प्रमुख प्रशिक्षक गटाचा भाग होणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. ती ऑस्ट्रेलियात पुरुष संघाकडून ग्रेड क्रिकेट खेळणारी पहिली महिला देखील ठरली होती.
इंग्लंडची सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे टेलर
टेलरने २०१९ मध्ये तणावामुळे अचानक वयाच्या ३० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. निवृत्तीपूर्वी ती महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक मानली जात असे. वनडे आणि टी२० मध्ये यष्ट्यांच्या मागे शिकार करण्याच्या बाबतीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तिने १२६ वनडे सामन्यात १३८ खेळाडूंना बाद केले होते. यात ५१ यष्टीचीत आणि ८७ झेल आहेत. तिच्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेची तृषा चेट्टी पुढे आहे. तिने ११६ वनडे सामन्यात १६१ शिकार केले आहेत. टेलरने ९० टी२० मध्ये ७४ ची शिकार केली. यात २३ झेल आणि ५१ यष्टिचीत आहेत.
इंग्लंडची दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज
टेलर इंग्लंड महिला क्रिकेटच्या इतिहासातील वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी दुसऱ्या क्रमांकाची फलंदाज आहे. तिने आपल्या कारकीर्दीत १२६ सामने खेळताना ४,१०१ धावा बनवील्या असून, तिच्यापुढे फक्त चार्लेट एडवर्ड आहे तिने ५,९९२ धावा काढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऍस्टलचे ‘ते’ तडाखेबंद द्विशतक आठवतय का? १९ वर्षापासून कोणीही मोडू शकला नाही तो विक्रम
अझरुद्दीनचा ‘सुपरमॅन’ अवतार, चित्त्याच्या चपळाईने केला रनआउट, पाहा व्हिडिओ