काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ घोषित केला. या संघात टी-20 क्रिकेटमध्ये वादळी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादव याला संधी दिली गेली. मात्र, मागच्या एक वर्षापासून रणजी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळी करणाऱ्या सरफराज खान याला मात्र वगळण्यात आले. मुंबई रणजी संघासाठी सरफराजने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. पण तरीदेखील त्याला वारंवार आंतरराष्ट्रीय पातळीवर डावलले जात आहे. अशात आता सरफराजने याविषयी नाराजी व्यक्त केली.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड न झाल्यामुळे सरफराज चांगलाच नाराज आहे. सरफराजने मागच्या एका वर्षात ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, त्याच्या जोरावर त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे होताना दिसत नाहीये. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडून सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे सरफराज देखील आता निराश झाला आहे. सरफराजने 2019 नंतर मुंबई संघासाठी खेळलेल्या 22 डावांमध्ये 134.64 च्या सरासरीने 9 शतक आणि पाच अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन द्विशतके, तर एक तिहेरी शतक देखील निघाले आणि 2289 धावा साकारल्या. याच पार्श्वभूमीवर चाहते त्याला भआरताचा ‘डॉन ब्रॅडमन’ असेही म्हणू लागले आहेत.
संघ घोषित झाल्यानंतर रात्रभर झोपला नाही सरफराज
आगामी कसोटी मालिकेसाठी संधी न मिळाल्यानंतर सरफराज म्हणाला, “संघ निवडला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आसामवरून दिल्लीला आलो. त्यादिवशी रात्रभर मी झोपू शकलो नाही. मी स्वतःला प्रश्न विचारत राहिलो की, मी तिथे (भारतीय संघात) का नाहीये? पण आता वडिलांसोबत चर्चा केल्यानंतर बरे वाटत आहे. मी पूर्णपणे तुटलो होतो. एवढ्या धावा केल्यानंतर जर तुम्हाला संधी मिळत नसेल, तर हो स्वभाविक आहे. मी देखील माणूस आहे, मशीन नाही. मी माझ्या वडिलांशी चर्चा केली आणि दिल्लीला आलो. आम्ही याठिकाणी सराव देखील केली.” (Sarfaraz Khan could not sleep all night as he did not get a chance in the Indian team)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादव टी-20त सुपरहिट, पण वनडेत फ्लॉप! तिरुअनंतपुरममध्ये पुन्हा ठरला अपयशी
अंडर 19 विश्वचषकात झिम्बाब्वे 25 धावांवर ऑलआउट, इंग्लंडने घडवला इतिहास