---Advertisement---

सोमवार-मंगळवारचा दिवस खान कुटुंबासाठी ठरला खास, सरफराजनंतर मुशीरनेही स्वतःला केलं सिद्ध

Musheer Khan
---Advertisement---

सध्या 19 वर्षांखालील वनडे विश्वचषक खेळला जात आहे. स्पर्धेतील 25वा सामना भारत आमि न्यूझीलंडमध्ये खेळला गेला. मुशीर खान विश्वचषकाच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून मंगळवारी (30 जानेवारी) त्याने अजून एक शतक ठोकले. हंगामातील हे मुशीरचे दुसरे शतक असून संघासाठी या धावा महत्वाच्या ठरल्या. मुशीरच्या कुटुंबासाठी मंगळवारआधी सोमवार (29 जानेवारी) देखील खास ठरला.

19 वर्षांखालील वनडे विश्वचषक स्पर्धा सध्या सुरू आहे. भारताने हंगामातील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. स्पर्धेतील आपला तिसरा सामना बारताने मंगळवारी (30 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध खेळला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 295 धावांची खेली केली. यातील 131 धावा या एकट्या मुशीर खान (Musheer Khan) याने केल्या. यासाठी त्याने 126 चेंडू असून 13 चौकार आणि 3 षटकाचांचा समावेश या खेळीत होता. 19 वर्षाखील विश्वचषकातील हे त्याचे दुसरे शतक ठरले. याआधी विश्वचषकातील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 118 धावांची खेळी केली होती. मंगळवारी तो 19 वर्षाखाली विश्वचषकाच्या चालू हंगामात 300+ धावा करणारा पहिला खेळाडू ठरला.

मुशीरच्या या प्रदर्शनामागे त्यांचे वडील आणि मोठा भाऊ यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. वडील नौशाद खान यांनी पहिल्यापासून आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. ते स्वतः मुलगा सरफराज (Sarfaraz Khan) आणि मुसीर यांचा सराव करून घेत. सरफराच पुढे देशांतर्गत आणि 19 वर्षांखालील भारतीय संखाडून खेळताना चमकला. त्यानंतर घरात लहान असलेल्या मुशीरला या दोघांकडून क्रिकेटचे धडे मिळत राहिले. याचेच फळ म्हणून 19 वर्षांखाली विश्वचषकात मुशीर चमकदार कामगिरी करत आहे.

मंगळवारी मुशीरच्या शतकी खेळीआधी खान कुटुंबाला अजून एक आनंदाची बातमी मिळाली. सोमवारी सरफराज खान याला भारतीय कसोटी संघात सामील करण्यात आले होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरफराजला भारतीय संघात निवडले गेले नव्हते. पण सोमवारी केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांना दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली. विराट कोहली देखील आधीच वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन कसोटी सामन्यामध्ये खेळत नाहीये. असात संघ व्यवस्थापाने सरफराज खान याला दुसऱ्या कसोटीसाटी संघात सामील केले. सरभराजसह सौरुभ कुमार आणि वॉशिंगटन सुंदर या दोघांनी कसोटी संघासोबत जोडण्यात आले. (Sarfaraz Khan made his place Test squad on Monday, while Musheer Khan scored a century in the U-19 World Cup on Tuesday.)

महत्वाच्या बातम्या – 
मोठी बातमी! जय शहा ACC अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, डोक्यात आहे मोठा प्लॅन
‘विराट माझ्यावर थुंकला…’, डीन एल्गरचा मोठा आरोप; दोघांमध्ये शिविगाळही झाली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---