आयपीएल 2021 स्पर्धा आता खऱ्या अर्थाने रंगलेली आहे. प्रत्येक सामना उत्कंठा वर्धक होत असून तळातील संघांना विजयाची नितांत गरज आहे. आज दिनांक 30 एप्रिल रोजी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना के एल राहुलच्या पंजाब किंग्जशी होणार आहे. मात्र या 2 दिग्गजांच्या लढतीत सर्वांची नजर असेल ती पंजाबचा युवा खेळाडू सरफराज खान वर.
सरफराज आहे आरसीबीचा माजी खेळाडू –
सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असलेल्या पंजाबकडून सरफराजला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर प्रेक्षकांना विराट विरुद्ध सरफराजचा संघर्ष बघायला मिळू शकतो. सरफराज हा आरसीबीचा माजी खेळाडू असून त्याने अनेक महत्त्वाच्या क्षणी आरसीबी संघासाठी उत्तम कामगिरी केलेली होती. त्याच्या या कामगिरीमुळेच 2018 सालच्या लीलावापूर्वी आरसीबीने सरफराजला आपल्या संघात कायम देखील केले होते. मात्र त्यानंतर विराटने सरफराजच्या फिटनेस वर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. 2019 साली आरसीबीने संघाबाहेर केल्यानंतर सरफराज हा आता पंजाब संघाचा भाग आहे.
सरफराजची आयपीएलमधील कामगिरी –
सरफराजच्या आयपीएलमधील कामगिरीचा विचार केला असता, त्याने आतापर्यंत 33 सामने खेळले आहेत. यात त्याने 27.25 ची सरासरी व 142.65 च्या स्ट्राईक रेटने 408 धावा बनवलेल्या आहेत. सरफराजने शेवटचा आयपीएल सामना 2019 साली खेळला असून त्या हंगामामध्ये त्याने 8 सामन्यात 128 च्या स्ट्राईक रेटने 408 धावा केल्या होत्या.
स्थानिक क्रिकेटमध्ये केली आहे कमाल –
सरफराजला संधी मिळण्याचे मुख्य कारण त्याची स्थानिक क्रिकेटमधील कामगिरी असणार आहे. मागील वर्षी झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने केवळ 2 सामन्यात 1 त्रिशतक व 1 द्वीशतकाच्या मदतीने 527 धावा केल्या होत्या.हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की जर सरफराजला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली तर तो कशा प्रकारे कामगिरी करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळाडू म्हणून ६ पैकी ६ आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू
रोहितला शुभेच्छा देताना पंत गंडला, रोहित घेणार का ‘त्या’ शब्दाचा समाचार
त्याच्यावर अनेकदा टीका झाली पण ‘त्याने’ मात्र बॅटनेच उत्तरं दिली!