भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहिल्यानंतर कसोटी पदार्पण करणाऱ्या मुंबईच्या सर्फराझ खानने संधीचे सोने करताना आपली उपयुक्तताही सिद्ध केली. प्रतिहल्ला करत त्याने ६६ चेंडूंत ६२ धावा करून सर्वांचे लक्ष तर वेधलेच, पण त्याचबरोबर वडिलांच्या नावावरून जर्सी क्रमांक निवडून आदरही व्यक्त केला. नौशाद हे सर्फराझच्या वडिलांचे नाव आहे.
याबरोबरच, इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत त्याचा प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. आज राजकोटवर अनिल कुंबळेच्या हस्ते त्याला पदार्पणाची कॅप देण्यात आली. यावेळी सर्फराज खानचे आई आणि पत्नी देखील उपस्थित होते. तसेच राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पणापासूनच सर्फराज खानने वर्चस्व गाजवले आहे.
राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध सरफराज खानची ही खेळी पाहण्यासाठी त्याचे वडील नौशाद खान आणि पत्नी रोमना जहूर राजकोटच्या स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामन्यादरम्यान रोमाना जहूर पती सरफराज खानला चिअर करत होती. तसेच सरफराज खानची पत्नी रोमाना जहूर हिचे काश्मीरशी खुप घट्ट नाते आहे. तर गेल्या वर्षी 6 ऑगस्ट 2023 रोजी सरफराज खानने काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील पाशपोरा गावात रोमाना जहूरसोबत लग्न केले होते.
रोमना जहूर आणि सरफराजचे चुलत भाऊ दिल्लीत एकत्र एमएससी शिकत होते. एकदा रोमाना जहूरची क्रिकेट सामन्यादरम्यान सरफराज खानशी भेट झाली होती. याबरोबरच, सरफराज खान आणि रोमना जहूर यांची आधी मैत्री झाली, नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते.
दरम्यान, मालिकेबद्दल बोलायंच झालं तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना इंग्लंडने 28 धावांनी जिंकला होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय मिळवत मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आणली आहे. तसेच रोहित शर्मा नौशाद खान यांच्या जवळ जाऊन त्यांना मिठी मारताना दिसतोय. रोहित शर्माने नौशद खान यांना बळ देणारे चार शब्द देखील बोलले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG 3rd Test : भारताने पहिल्या डावात केल्या 445 धावा, पदार्पण सामन्यात ध्रुव जुरेलचे अर्धशतक हुकले
- NZ vs SA : दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने केला पराभव, संपला 92 वर्षांचा दुष्काळ