चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये पाकिस्तानने अंतिम सामना भारताविरुद्ध जिंकला होता. हा विजय पाकिस्तान संघासाठी नेहमीच लक्षात राहणारा ठरला. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार सफराज अहमद होता. अंतिम सामन्यात भारताला मात दिल्यानंतर सरफराज अहमद चांगलाच चर्चेत आला होता. आता या सामन्याला 6 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. याविषयी बोलताना अहमदने भारतीय संघ आणि खेळाडूंविषयी खास प्रतिक्रिया दिली.
सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याने 2017 मध्ये पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देऊ शकला. पण सध्या तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाहेर आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने कसेबसे कसोटी क्रिकेटमधून जबरदस्त पुनरागमन केले. 2019 नंतर त्याने थेड डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तानसाठी कसोटी सामना खेळला. पुनरागमनानंतर शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने 336 धावा कुटल्या आहेत. सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करणारा बाबर झाम 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघासाठी नवखाच खेळाडू होता. माध्यमां अहमदने याविषयी सविस्तर बोलला.
एका पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीत अहमदला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या अंतिम सामन्याविषयी प्रश्न विचारले गेले. यावेळी तो म्हणाला, “चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा अंतिम सामना मी कधीच विसरू शकत नाही. भारताविरुद्ध अंतिम सामन्याती विजय शब्दांमध्ये मांडू शकत नाही. हा कोणता साधारण सामना असता, तर जास्त महत्व नव्हते. भारताविरुद्ध आम्ही याआधीही जिंकलो होतो. जो संघ कितीही धावांचे लक्ष्य गाठू शकते, त्याविरोधात अंतिम सामना जिंकणे खरोखर अविश्वसनीय होते.”
“भारतासाठी कोणतेही लक्ष्य जास्त नव्हते. त्यांच्याकडे रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी असे खेळाडू होते. दुसरीकडे आमच्या खेळाडूंचे दुधाचे दातही पडले नव्हते. आमच्याकडे खेळण्यासाठी लहान मुलं होती, जी पाकिस्तान संघाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन चालले होती. बाबार आझम, हसन अली, शादाब खान आणि फहीम अशरफ हे सर्वजन त्यावेळी अगदी युवा खेळाडू होते,” असे अहमद या मुलाखतीत म्हणाला.
दरम्यान, या सामन्याचा विचार केला (2017 Champions Trophy Final), तर भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी पाकिस्तानला आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 बाद 338 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रोहित, विराट आणि धोनी प्रतिनिधित्व करणारा भारतीय संघ हे लक्ष्य गाठू शकला नाही. भारताने 30.3 षटकांमध्ये अवघ्या 158 धावांवर सर्वबाद झाला. (Sarfraz Ahmed reacts exclusively to the 2017 Champions Trophy win against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ अष्टपैलू आहे जगातील बेस्ट फिल्डर, स्वतः जॉन्टी रोड्सने सांगितले नाव
काय सांगता! सचिनचा लेक गाजवणार आयपीएल 2023? स्वतः रोहित म्हणाला…