---Advertisement---

“सासरी खुप धावा कर”, पाहा कोणी दिल्या शिखरला वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा

---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा आज 35 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यापैकी भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरला आहे.

सेहवागने शिखरला शुभेच्छा देताना त्याच्याच सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. तसेच लिहिले आहे की ‘नेहमी हसत राहाणाऱ्या शिखर धवनला वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा. सासरी खुप धावा कर. बाकी सामन्यातही धावा कर. आनंद साजरा कर. तुला खुप सेलिब्रेशन करण्याच्या संधी मिळो, इतक्या की तुझ्या मांड्या लाल व्हाव्यात.’

https://twitter.com/virendersehwag/status/1335071844336975875

शिखरने 2012 ला ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असणाऱ्या आयेशा मुखर्जीशी लग्न केले आहे. त्यामुळे शिखरला ज्यावेळी क्रिकेटमधून विश्रांती मिळते, तेव्हा तो ऑस्ट्रेलियामध्ये जातो. तसेच सध्या तो भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच आहे.

शिखरला सेहवाग व्यतिरिक्त युवराज सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, केएल राहुल अशा अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराजने शुभेच्छा देताना म्हटले आहे की ‘जटजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला चांगले आरोग्य मिळो आणि खुप यश मिळो.’

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1335078955825524736

https://twitter.com/klrahul11/status/1335105551882055683

https://twitter.com/VVSLaxman281/status/1335076025072422912

https://twitter.com/imkuldeep18/status/1335182240221810688

https://twitter.com/DineshKarthik/status/1335119331521253376

https://twitter.com/RishabhPant17/status/1335107194933583873

शिखरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 34 कसोटीत 2315 धावा केल्या आहेत. तसेच 139 वनडेत 5808 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 61 सामन्यात 1589 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘हे हिंदू गद्दार आहेत…’, शेतकरी आंदोलनात युवराज सिंगच्या वडिलांचे वादग्रस्त विधान; Video जोरदार व्हायरल

“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”

‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी

ट्रेंडिंग लेख –

‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?

पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---