पुणे | सत्यम व्हेकेशन्स यांच्या तर्फे आयोजित 4थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-20क्रिकेट स्पर्धेत सत्यम व्हेकेशन्स व वेंकीज या संघांनी अनुक्रमे टेक महिंद्रा व सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पूना क्लब क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत दिव्यांग हिंगणेकर याने(128धावा) केलेल्या शतकी खेळीसह दिग्विजय देशमुख(5-7)च्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सत्यम व्हेकेशन्स संघाने टेक महिंद्राचा 128धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली.
पहिल्यांदा खेळताना सत्यम व्हेकेशन्स संघाने 20षटकात 6बाद 250धावाचे आव्हान उभे केले. यात दिव्यांग हिंगणेकरने 51 चेंडूत 9चौकार व 13षटकारांसह 128धावांची शतकी खेळी केली.
दिव्यांगला संजय जोशीने 44 चेंडूत 61धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. 250धावांचे आव्हान टेक महिंद्रा संघ पेलू शकला नाही.त्यांचा डाव 20षटकात 6बाद 122धावावर आटोपला. यामध्ये गुरप्रीत सिंग 26, विवेक पदमनाभन नाबाद 46यांनी धावा केल्या. सत्यम व्हेकेशन्सच्या दिग्विजय देशमुखने 7धावांत 5गडी बाद केले. सामन्याचा मानकरी दिव्यांग हिंगणेकर ठरला.
दुसऱ्या सामन्यात सागर बिरवाडे(3-14)याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर वेंकीज संघाने सॉफ्टहार्ड ऑटोमेशनचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन: 20षटकात 9बाद 119धावा(निखिल भुजबळ 34, प्रणित राणे 2-15, सागर बिरवाडे 3-14)पराभूत वि.वेंकीज: 15.2षटकात 5बाद 121धावा(अरविंद चौहान 29, विपुल खैरे नाबाद 20, आतिश कुंभार नाबाद 32, पराग सागर 3-27);सामनावीर-सागर बिरवाडे; वेंकीज 5 गडी राखून विजयी;
सत्यम व्हेकेशन्स: 20षटकात 6बाद 250धावा(संजय जोशी 61(44), दिव्यांग हिंगणेकर 128(51,4×9, 6×13), सचिन कुलकर्णी 3-25)वि.वि.टेक महिंद्रा: 20षटकात 6बाद 122धावा(गुरप्रीत सिंग 26, विवेक पदमनाभन नाबाद 46(37), दिग्विजय देशमुख 5-7);सामनावीर-दिव्यांग हिंगणेकर; सत्यम व्हेकेशन्स 128धावांनी विजयी.