आपल्यापैकी अनेकज क्रिकेटचा सामना असला की, ऑनलाईन संघ तयार करून पैसे कमावण्यासाठी धडपड करत असतात. बिहारच्या भोजपुर जिल्ह्यातील सौरभ कुमार देखील मागच्या मोठ्या काळापासून ड्रीम 11 मधून पैसे करण्यासाठी प्रयत्न करत होता. पण अखेर काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रयत्नांनी यश आले. मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता आणि उभय संघातील या टी-20 मालिकेदरम्यान सौरभ कुमराने एक कोटी रुपये जिंकले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका भारताने 2-1 अशा अंतराने जिंकली. मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर (मंगळवार) रोजी खेळला होला होता. हार्दिंक पंड्या केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव या तिघांनी या सामन्यात वादळी खेळी केली होती, पण तरीही संघाला पराभव पाहावा लागला. भारताने हा सामना चार विकेट्सच्या अंतराने गमावला असला, तरीही सौरभ कुमारला मात्र याचा फायदा झाला. त्याने या सामन्यासाठी ड्रीम 11 स्वतःची प्लेइंग इलेव्हन बनवली होती. त्याचा हा संघ एकूण 65 लाख लोकांमधून सर्वोत्तम कामगिरी करणारा ठरला आणि यासाठी त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देखील मिळाले.
सौरभ भोजपूर जिल्ह्यातील चरपोखरीच्या ठकुरीचा राहणार आहे. त्याने या सामन्यावर अवघे 49 रुपये लावले होते आणि बदल्यात त्याला एक कोटींचे बक्षीस मिळाले आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या संघाचा कर्णधार होता, ज्याने अवघ्या 30 चेंडूत नाबाद 71 धावा कुटल्या होत्या. तसेच सलामीवीर केएल राहुल (35 चेंडूत 55 धावा) आणि सूर्यकुमार यादव (25 चेंडूत 46 धावा) देखील त्याच्या संघात सहभागी होता,
सौरभ मागच्या दोन वर्षांपासून ड्रीम इलेव्हनवर संघ बनवण्यासाठी पैसे खर्च करत होता. तो नियमितपणे 49-50 रुपये खर्च करायचा आणि त्याच्या घरच्यांनी ही गोष्ट माहीत नव्हती. जेव्हा त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले, तेव्हा कुठे त्याच्या घरच्यांना याबाबत माहिती मिळाली. सौरभला बक्षीस जरी एक कोटीचे मिळाले असले, तरी त्यातील 70 लाख रुपये प्रत्यक्षात त्याला मिळणार आहेत. कारण राहिलेले 30 लाख रुपये सरकारच्या टॅक्सच्या रूपात कापले जातील. त्याने अशीही माहिती दिली की, या 70 लाख रुपयांचे पुढे काय करायचे, ते त्याचे वडील ठरवतील. तो सध्या बीपीएससीची तयारी करत आहे
सौरभ ने बताया कि वे लंबे समय से टीम बना रहे थे. वे टीम बनाने में मामूली 49-50 रुपए खर्च करते थे. लेकिन उन्हें कामयाबी नहीं मिल रही थी. मजे की बात यह कि दो साल से टीम बनाने में लगे सौरभ के इस कारनामे की जानकारी उनके घरवालों को नहीं थी. जब उनसे पूछा गया तो उन्होंने हंसते हुए कहा कि एक करोड़ रुपए जीतने के बाद उनके घरवालों को इस बारे में पता चला. हालांकि उनका हंसना यह बता रहा था कि जीतने के पहले घरवालों को अगर पता चल जाता तो बवंडर हो जाता. इस तरह पैसा फूंकने को लेकर उन्हें घरवालों की झाड़ भी सुननी पड़ सकती थी. सौरभ सध्या डिग्रीचे शिक्षण घेत आहे आणि त्यानंतर बीपीएससी परिक्षेच्या तयारीला लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर कोचचा राजीनामा, दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूचा कारनामा!
गोष्ट एका क्रिकेटरची: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान