देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मानाची प्रथम श्रेणी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे सामने रविवारी (12 फेब्रुवारी) पार पडले. पहिल्या उपांत्य सामन्यात बंगालने गतविजेत्या मध्य प्रदेशचा 306 धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर, सौराष्ट्राने मयंक अगरवाल याच्या नेतृत्वातील कर्नाटक संघाला चार गड्यांनी मात देत, मागील दहा वर्षात पाचव्यांदा अंतिम फेरी खेळण्याचा मान मिळवला.
𝙄𝙣𝙩𝙤 𝙩𝙝𝙚 𝙁𝙞𝙣𝙖𝙡𝙨! 👏🏻👏🏻
Bengal register a 306-run victory over Madhya Pradesh in #SF1 of the @mastercardindia #RanjiTrophy and seal their position in the finals!
Scorecard ▶️ https://t.co/ZaeuZQqC3Y #MPvBEN pic.twitter.com/pOWkc1gD41
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 12, 2023
इंदोर येथे झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान मध्य प्रदेश संघाचे पारडे जड होते. मात्र, अनुभवी मनोज तिवारी याच्या नेतृत्वातील बंगाल संघाने त्यांच्यावर वर्चस्व गाजवले. सुदीप घरामी व अनस्तूप मुजुमदार यांच्या शतकांच्या जोरावर बंगालने आपल्या पहिल्या डावात 438 धावा उभ्या केल्या. या धावांच्या प्रतिउत्तरात मध्य प्रदेश संघ केवळ 170 धावांमध्ये सर्वबाद झाला. आकाशदीप याने पाच बळी घेत बंगालसाठी सर्वोत्तम कामगिरी केली. पहिल्या डावात मिळालेल्या मोठ्या आघाडीनंतर बंगालने दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी करत 279 धावा केल्या. विजयासाठी मिळालेल्या 547 धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा डाव 241 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह बंगालने दोन वर्षानंतर पुन्हा अंतिम फेरीत जागा मिळवली.
बेंगलोर येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान कर्नाटक संघाला सौराष्ट्राने पराभूत करत दहा वर्षात पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. कर्नाटकने पहिल्या डावात कर्णधार मयंक अगरवालच्या 249 धावांच्या जोरावर 407 धावा उभारल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना सौराष्ट्राकडून अनुभवी शेल्डन जॅक्सन याने 160 तर कर्णधार अर्पित वसावदा याने द्विशतक करत 527 धावा काढल्या. कर्नाटकने दुसऱ्या डावात निकीन जोसच्या शतकानंतर 234 धावा केल्या. मात्र, त्यानंतर सौराष्ट्राने विजयासाठी मिळालेले 117 आवांचे आव्हान सहा गडी गमावत पूर्ण केले.
(Saurashtra And Bengal Entered In Ranji Trophy 2022-2023 Finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते