---Advertisement---

संधीची प्रतिक्षा! तब्बल २३७ विकेट्स अन् १३११ धावा, ‘सौराष्ट्रचा जडेजा’ ठोठावतोय टीम इंडियाचं दार

On: सोमवार, मे 24, 2021 11:17 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने गेल्या काही वर्षात भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जडेजाने देखील भारतीय संघात येण्यापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वादळ आणले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाकडून खेळताना जडेजाने तिहेरी शतक झळकावले होते. याच संघात आणखी एक जडेजा आहे, जो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून भारतीय संघात संधी मिळण्याची वाट पाहत आहे.

ज्याप्रकारे रवींद्र जडेजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच सौराष्ट्र क्रिकेट संघाचा खेळाडू धर्मेंद्र जडेजा देखील आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. धर्मेंद्रने गेल्या ३-४ हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

धर्मेंद्र जडेजाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण ६० सामने खेळले आहेत. यात त्याने २८.३२ च्या सरासरीने २३७ गडी बाद केले आहेत. यासोबतच त्याने १८.३२ च्या सरासरीने १३११ धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या लिस्ट ए कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ५१ सामने खेळले आहेत. यात त्याला ६९ गडी बाद करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने ३४७ धावा देखील केल्या आहेत. त्याने आपल्या देशांतर्गत कारकीर्दीत एकूण ४१ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याला २७ गडी बाद करण्यात यश आले आहे.

रवींद्र जडेजा हा मॉर्डन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीत अव्वलस्थानी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वेगळीच छाप सोडली आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, धर्मेंद्र जडेजा देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. या दोघांमध्ये बरेचसे साम्य आहे. दोघेही डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतात. तसेच डाव्या हातानेच फलंदाजी करतात. लवकरच हा खेळाडू भारतीय संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

कोटींमध्ये पगार मिळणारे क्रिकेटविश्वातील टॉप-१० कर्णधार, कोहली नव्हे ‘या’ संघनायकाला मिळते सर्वाधिक वेतन

टेस्ट चॅम्पियनशीप: ‘या’ धाकड अष्टपैलूच्या अनुपस्थित शार्दुलला मिळावी संधी, प्रशिक्षकाने मांडले मत

वडिलांच्या एका चुकीमुळे पृथ्वी शॉला झाला होता ८ महिन्यांचा वनवास, स्वत:च दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---