इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानात सुरू झाला आहे. यादरम्यान हा कसोटी सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनीदेखील हजेरी लावली आहे. सौरव गांगुली यांच्या कारकिर्दीत लॉर्ड्सच्या मैदानाचे एक वेगळेच महत्व आहे.
इंस्टाग्रामवर याबाबतचा फोटो शेअर करत सौरव गांगुली यांनी त्यांच्या ३ वेगवेगळ्या भूमिकांतील आठवणींना उजाळा दिला आहे. सौरव गांगुलीचा पहिला कसोटी सामना असो व टी शर्ट काढून हवेत भिरकावत विजयोत्सव साजरा करणे असो. या सर्व गोष्टी याच लॉर्ड्सच्या मैदानात घडल्या आहेत. या सर्व गोष्टींना उजाळा देत सौरव गांगुली यांनी इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला.
ज्यामध्ये त्यांनी लिहिले, “१९९६ मध्ये पहिल्यांदा मी एक क्रिकेटपटू म्हणून आलो होतो. त्यानंतर एक कर्णधार म्हणून आणि आज बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून इथे आलो आहे. भारतीय संघ आधीही चांगल्या स्थितीत होता आणि आजही चांगल्या स्थितीत आहे. उत्कृष्ट असा हा क्रिकेटचा खेळ आहे.”
१९९६ साली एक खेळाडू म्हणून सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानात पदार्पण करत आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. विशेष म्हणजे आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच सौरव गांगुलीने शतकी खेळी केली होती, ज्यामध्ये त्यांनी १३१ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील ‘दादा’गिरीला सुरुवात केली होती.
त्याचबरोबर सौरव गांगुलीची आणि चाहत्यांची सर्वात जास्त आठवणीत असलेला क्षण म्हणजे, १३ जुलै २००२ साली लॉर्ड्सच्या याच मैदानात अंतिम सामन्यात विजय मिळवून, बाल्कनीतून टी शर्ट काढून हवेत भिरकवण्याचा तो क्षण. ती आठवण चाहत्यांच्या मनात अजूनही तशीच आहे.
https://www.instagram.com/p/CSeizpxl_5e/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ ३ बाद २७६ धावा अशा स्थितीत आहे. रोहित शर्माने ८३ धावांचे योगदान दिले आहे. कर्णधार विराट कोहली ४२ धावांवर बाद झाला. तर केएल राहुल १२७ धावांसह मैदानावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
–गुरुनंतर शिष्याची शंभरी! क्रिकेटच्या पंढरीत राहुलची सेंचूरी, तब्बल ३१ वर्षांनंतर झाला हा पराक्रम
–राहुलने गाठला वीरू! खणखणीत शतकासह विक्रमांची घातली रास, सेहवागचीही केली बरोबरी
–पुजाराची ही कामगिरी पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल आणि म्हणाल, भाऊ… अजून किती दिवस चालायचं हे?