---Advertisement---

धक्कादायक! दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पहिला वनडे सामना स्थगित

On: शुक्रवार, डिसेंबर 4, 2020 4:15 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघाबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. या संघांमधील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी (४ डिसेंबर) स्थगित करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, “क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी (६ डिसेंबर) पार्लच्या जवळपास खेळवण्याची घोषणा करत आहे. हा निर्णय दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने घेतला जात आहे.”

सीएसएचे मुख्य अधिकारी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेतील पुढील उर्वरित दोन सामने अनुक्रमे सोमवारी (७ डिसेंबर) आणि बुधवारी (९ डिसेंबर) खेळवण्यासाठी संमती दर्शवली आहे.

यापूर्वी हे तीन वनडे सामने अनुक्रमे ४, ६, आणि ९ डिसेंबरला खेळवण्यात येणार होते. सध्या दोन्हीही संघ आपापल्या जैव-सुरक्षित वातावरणात परतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता..! ‘या’ गोलंदाजाने मोडला पॉन्टिंगचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम, आता लक्ष्य एमएस धोनी

ब्रेकिंग! वनडे पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही टी नटराजनचे पदार्पण

एमएस धोनीमुळेच झालं शक्य ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या तुफानी खेळीबद्दल जडेजाचा मोठा खुलासा

ट्रेंडिंग लेख-

…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली

गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर

भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---