नेदर्लंड्सविरुद्धच्या सामन्यात मंगळवारी (17 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघ चांगलाच अडचणीत दिसला. संघाची धावसंख्या 109 अशताना आफ्रिकी संघाने पहिल्या 6 विकेट्स गमावल्या होत्या. पण डेविड मिलर खेळपट्टीवर असल्यामुळे आफ्रिकेच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र, डावातील 31व्या षटकात मिलरने देखील विकेट गमावली.
नेदर्लंड्सचा वेगवान गोलंदाज लोगन वॅन बिक (Logan van Beek) याने 31व्या षटकातील शेटवचा चेंडूवरून त्याने डेविड मिलर (David Miller) याला त्रिफळाचीत केले. मिरलने या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क अपेक्षित पद्धतीने झाला नाही. परिणामी स्टंप्सच्या अगदी वरच्या टोकाला चेंडू लागला आणि बेल्स हवेत उडाल्यानंतर मिलरला खेळपट्टी सोडावी लागली. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर अशी ओळख असणाऱ्या मिलरने या सामन्यात 52 चेंडूत 43 धावांची खेळी केली. मात्र, संघासाठी सामन्याचा शेवट गोड करू शकला नाही. मिलरच्या विकेटवेळी संघाची धावसंख्या 145 असून सातवी विकेट गमावली होती.
DAVID MILLER IS GONE…..!!!!
South Africa 7 down, Netherlands roaring, an upset on the way for the Dutch. pic.twitter.com/BXaX6FAvBc
— Johns. (@CricCrazyJohns) October 17, 2023
(SAvsNED Big Wicket for Netherlands as David Miller is dismissed for 43)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झे.
नेदरलँड्स – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन वॅन बिक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा झटका, संघातील ‘हे’ खेळाडू तापाने फणफणले
SAvsNED । वयाच्या 28व्या वर्षी रबाडाने पार केला मैलाचा दगड! वनडेतील आकडेवारी भूरळ घालणारी