---Advertisement---

‘माझ्यावरही अन्याय झाला’, वृद्धिमान सहाला धमकी प्रकरणानंतर माजी खेळाडूने मांडली व्यथा

On: गुरूवार, फेब्रुवारी 24, 2022 3:59 PM
Syed-Kirmani
---Advertisement---

भारतीय संघाचा (Team India) अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहा (Wriddhiman Saha) सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सहाला एका पत्रकाराकडून धमकावण्याचा प्रयत्न केला गेला आहे, ज्याची माहिती त्याने स्वतः ट्वीटरवर दिली. परंतु, यावेळी सहाने त्या पत्रकाराचे नाव उघड केले नाही. आता सहासोबत झालेल्या या कृत्त्यावर भारताचे माजी यष्टीरभक फलंदाज सय्यद किरमानी (Syed Kirmani) यांनी स्वतःचे मत व्यक्त केले आहे. यावेळी किरमानींनी स्वतःसोबतही असाच अन्याय झाल्याचे सांगितले.

स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत किरमानी म्हणाले की, “सहाला आयपीएल आणि मर्यादित षटकांच्या अन्य सामन्यांमध्ये युवा खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनामुळे जबरदस्त प्रतिस्पर्धा मिळाली आहे. उघड आहे की, तो खूप दुःखी आहे, पण प्रत्येक क्रिकेटपटूला चढ-उताराला सामोरे जावे लागते, होय ना ? मला नाहीत नाही की, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन खेळाडूंविषयी काय विचार करत आहे. मी देखील अन्यायाचा शिकार झालो आहे. परंतु, याविषयी कोणीच बोलत नाही.”

किमरानींच्या मते कोणतीही चूक नसकताना त्यांना संघातून बाहेर केले गेले होते. ते म्हणाले की, “मला माहीत नाही, मी त्यावेळी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. तरीही, मला कोणतीही चूक नसताना कसोटी आणि एकदिवसीय संघातून बाहेर केले गेले. माझ्या आजूबाजूला कोणी प्रतिस्पर्धीही नव्हता. मी ८८ कसोटी खेळल्या आणि आनेक वेळा भारताला एकदिवसीयमध्येही विजय मिळवून दिला.”

“तुम्हाला माहीती आहे का की, वृत्तापत्रात चुकीच्या बातम्या छापल्या गेल्या होत्या की, मी खराब प्रदर्शन करत आहे. खरं तर कोणीतरी दुसऱ्याने स्लिपमध्ये झेल सोडला आणि ते (मीडिया) माझा फोटो छापत असायचे. ते संकेत द्यायचे की, किमरानीने एक झेल सोडला होता, एक स्टंपिंग हुकवली होती.”

किरमानीने पुढे बोलताना देशांतर्गत क्रिकेटमधला एक किस्साही सांगितला, जेव्हा त्यांचा संघ कर्नाटकने त्यांना पुनरागमन करण्याची संधी दिली नव्हती. त्यावेळी किरमानी रेल्वे संघासाठी खेळले होते. शेवटी बोलताना त्यांनी वृद्धिमान सहाला एक सल्ला दिला. ते म्हणाले की, “सहा एक शुर क्रिकेटपटू आहे. त्याने तोपर्यंत खेळत राहिले पाहिजे, जोपर्यंत तो खेळाचा आनंद घेत आहे. निवृत्ती त्याच्या स्वतःच्या हातात आहे. त्याला कोणीच (निवृत्ती घेण्यासाठी) जबरदस्ती करू शकत नाही.”

महत्वाच्या बातम्या –

संजू सॅमसनची टी-२० विश्वचषकासाठी निवड निश्चित? कर्णधार रोहित शर्मा काय म्हणतोय पाहा

केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही

‘सुट्टी तेव्हाच घेईल, जेव्हा…’, म्हणत रोहित शर्माने दिले बायो-बबलच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---