साउथॅम्पटन। आयसीसी 2019 विश्वचषकात आज(5जून) आठवा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेचा या विश्वचषकातील तिसरा सामना आहे, तर भारताचा पहिलाच सामना आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
पावसामुळे या दोन्ही संघाचे काल(4 जून) सरावही पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे आजही पावसाची शक्यता आहे. पण दिलासा देणारी गोष्ट अशी की आज हवामान अंदाजानुसार पावसाच्या हलक्या सरी असतील आणि पूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहिल. मात्र त्याचबरोबर स्थानिक प्रमाणवेळे नुसार या सामन्यात दुपारच्या वेळेला पावसाची जास्त शक्यता राहिल.
तसेच तापमान हे थंड असेल. कमाल तापमान 17 °C असेल तर किमान तापमान 8°C असेल. त्याचबरोबर सामन्यादरम्यान 50-60% आद्रता असू शकते.
साउथॅम्पटनमधील अशी थंड परिस्थिती पाहता दोन्ही संघ वेगवान गोलंदाजांना पहिली पसंती देतील. याबद्दल या सामन्याच्या पूर्व संधेला पत्रकार परिषदेत बोलताना विराटनेही सुचीत केले आहे. त्यामुळे भारतीय संघ आज(5 जून) मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या तिघांनाही खेळवू शकतो.
या सामन्याला भारतीय प्रमाणवेळे नुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना द रोज बॉल स्टेडियमवर होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ज्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण केले त्याचाच विक्रम आज धोनी मोडणार?
–रोहित शर्माला आज विश्वचषकात हिट विक्रम करण्याची संधी, सौरव दादालाही टाकू शकतो मागे
–किंग कोहलीला आहे आज विराट विक्रम करण्याची संधी
–विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या अंतिम ११ जणांमध्ये या खेळाडूंना मिळू शकते संधी
–ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज गोलंदाज म्हणतो, धोनी भारतासाठी महत्त्वाचा घटक…