---Advertisement---

कांगारू करणार इंग्लंडवर आणखी एक वार! ‘या’ तेजतर्रार गोलंदाजाला मिळाली तिसऱ्या कसोटीसाठी संधी

On: मंगळवार, डिसेंबर 21, 2021 10:09 PM
scott-boland
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ऍशेस (Ashes) कसोटी मालिकेत (AUS vs ENG) यजमान संघ मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियन संघाने ब्रिस्बेन कसोटी (Brisbane Test) सामन्यानंतर ऍडिलेड ओव्हलवर दिवस-रात्र कसोटी सामनाही जिंकला आहे (Adelaide Day-Night Test). यजमानांनी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत संघाने आपल्या दिग्गज वेगवान गोलंदाजांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन केले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड (Scott Boland) मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

स्कॉट बोलँडचा संघात समावेश करण्यामागचे मोठे कारणही समोर आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘स्कॉट ऍडिलेडमध्ये संघासोबत सराव करत होता आणि त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी विजयानंतर वैद्यकीय टीम वेगवान गोलंदाजांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करत आहे. २०१८-२०१९ मध्ये मार्श शेफिल्ड शील्ड प्लेयर ऑफ द इयर (Marsh Sheffield Shield Player Of The Year) पुरस्काराने सन्मानित झालेल्या स्कॉटचा उत्कृष्ट फॉर्म होता. त्याने व्हिक्टोरियासाठी २ सामन्यात १० च्या सरासरीने १५ बळी घेत चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वी ब्रिस्बेन येथे इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यातही तो सहभागी झाला होता.

पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड साइड स्ट्रेनमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला होता. त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) एका कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याला अलग राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे तो दुसरा सामना खेळला नाही. अशा स्थितीत मिचेल स्टार्कने सलग दोन कसोटी सामने खेळले असून, ती मालिका मोठी असल्यामुळे त्याच्यावर जास्त ताण न येण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रयत्न करत आहे. कारण, सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ २-० च्या आघाडीसह चांगल्या स्थितीत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तेव्हा चालतानाही खूप वेदना व्हायच्या’, अश्विनने क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात कठीण स्थितीचा केला उलगडा

भारतीय क्रिकेटमध्ये फुटले वादांचे पेव: आता अश्विन-शास्त्री आमने-सामने; वाचा पूर्ण प्रकरण

पुजारा-रहाणेला जुन्या रंगात आणण्यासाठी महागुरूने घेतली धोनीच्या ‘शागीर्द’ची मदत, व्हिडिओ व्हायरल

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---