---Advertisement---

सुर्यकुमार यादव दुसऱ्या देशाकडून खेळणार? ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या ट्वीटनंतर चर्चेला उधाण

---Advertisement---

नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, भारताच्या या अंतिम पथकात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

अशात बुधवारी (२८ ऑक्टोबर) झालेल्या मुंबई आणि बेंगलोर सामन्यात सूर्यकुमारने धुवांधार फलंदाजी करत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा सूर्यकुमारची संघात निवड न होण्याबद्दल चर्चा रंगू लागली आहे. परंतु न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस यांनी तर सूर्यकुमारला थेट परदेशाकडून खेळण्याचा सल्ला दिला आहे.

सूर्यकुमारला दिली न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर!

न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक स्कॉट स्टायरिश यांनी ट्विट करत सूर्यकुमारला न्यूझीलंड संघाकडून खेळण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘जर सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल. तर तो परदेशी क्रिकेट संघाकडून खेळू शकतो.’

या ट्विटमध्ये स्कॉट स्टायरिश यांनी #CoughNZCough असे हॅशटॅग दिले आहे. याचा अप्रत्यक्षपणे असा अर्थ होतो की, त्यांनी सूर्यकुमारला परदेशी संघांपैकी न्यूझीलंड संघ निवडण्याचा पर्याय दिला आहे.

बेंगलोर विरुद्धच्या सामन्यातील सूर्यकुमारची कामगिरी

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला होता. या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला १६५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सुर्यकुमारने ४३ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्या खेळीमुळे मुंबईने १९.१ षटकातच १६६ धावा करत सामना ५ विकेट्सने जिंकला.

मुंबईने प्लेऑफमधील स्थान जवळपास केले पक्के

हा मुंबईचा या आयपीएल हंगामातील ८वा विजय होता. त्यामुळे मुंबई संघ १६ गुण आणि +१.१८६ नेट रन रेटसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. एवढेच नव्हे तर, त्यांचे प्लेऑफमधील स्थानदेखील जवळपास पक्के झाले आहे. तर दूसऱ्या बाजूला बेंगलोरचा हा हंगामातील ५वा पराभव होता. तरी त्यांचा संघ १४ गुण आणि +०.०४८ नेट रन रेटसह गुणतालिकेत दूसऱ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“निवडकर्त्यांनी सूर्यकुमारची खेळी पहिली असावी…” माजी दिग्गजाने निवड समीतीला फटकारले

“सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या फ्लाइटमध्ये असायला हवे”

“कणखर राहा आणि संयम ठेव”, भारतीय प्रशिक्षकाचा सूर्यकुमार यादवला सल्ला

ट्रेडिंग लेख-

Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर

हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---